Relationship Tips : ते म्हणतात ना...नातं जोडायला जितका वेळ लागतो. तितका वेळ नातं तोडायला लागत नाही.. त्यामुळे जोडीदारांना त्यांच्या चुका सांभाळून घेऊन एकमेकांना आयुष्यभर साथ दिली पाहिजे तरच ते नातं दीर्घकाळ टिकतं.. तसं प्रत्येक नात्यात छोटी-मोठी भांडणं होतच असतात, असं म्हणतात नात्यात भांडण्याशिवाय मजा नाही, प्रेम वाढतं. पण जर हेच भांडण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तर त्याचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. आपल्या सर्वांना माहित आहे की, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. विश्वास तुटला तर नातंही तुटू शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या नातं टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर जोडप्यांनो.. तुमच्या नात्यातील काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा लोक तुमची खिल्ली उडवायलाच बसलेत..


 


नात्याची गुपितं तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका...


जोडप्यांबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक जोडपे आपलं नातं घट्ट करण्यासाठी अनेक सकारात्मक पावलं उचलतात, पण कधी कधी इच्छा नसतानाही एखादी छोटीशी चूक त्यांच्या नात्याला धोका निर्माण करते. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, नात्यात आंबटपणा नेहमी तिसऱ्या व्यक्तीमुळे येतो, आणि हे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. खरं तर, अनेकदा जेव्हा आपण आपल्या नात्याची गुपितं तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा ती तिसरी व्यक्ती तुमची शुभचिंतक असेलच असं नाही. या कारणास्तव, असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या नात्यातील काही गोष्टी इतर कोणालाही सांगू नका.


 


तुमच्या नात्यातील 'या' गोष्टी गुप्त ठेवा..


जर तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण होत असेल किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा तुमच्या कुटुंबियांशी जमत नसेल तर हे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. हा तुमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, जो फक्त तुम्ही आणि तुमचा पार्टनर सोडवू शकता. 



जर तुमची आर्थिक स्थिती थोडी खराब असेल तर ही बाब फक्त तुमच्यावर आणि तुमच्या जोडीदारावर सोडा. जर तुम्ही हे इतर कोणाला सांगितले तर तुमच्या जोडीदाराला याचे वाईट वाटू शकते.



तुमच्या पार्टनरमध्ये काही कमतरता असेल तर पार्टनरशी बोलून ती दूर करा. हे कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका, कारण केवळ तुम्ही किंवा तुमचा पार्टनर ही कमतरता दूर करू शकता. तिसरी व्यक्ती तुमचे बोलणे ऐकून तुमची चेष्टा करू शकते.


 


तुमच्या जोडीदाराची गुपितं तुमच्या मित्रांनाही सांगू नका. काही गोष्टी तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या दरम्यान राहिल्या पाहिजेत, त्यामुळे विशेषत: हे लक्षात ठेवा की तुमच्या जोडीदाराचे रहस्य कोणालाही सांगू नका.



तुमचा आणि तुमच्या जोडीदाराच्या क्वालिटी टाइमबद्दल तिसऱ्या व्यक्तीला कधीही सांगू नका. अनेकवेळा असे घडते, जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशी तरी शेअर करता, पण तिसरी व्यक्ती तुमच्या भावनांची खिल्ली उडवू शकते.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Relationship Tips : 'असला जोडीदार नको गं बाई!' तुमच्यासाठी योग्य जोडीदार कसा ओळखाल? लग्नानंतर सुखी आयुष्य हवंय? हे संकेत जाणून घ्या,