Relationship Tips : आपण अनेकदा पाहतो, नात्यात जोडीदार हे एकमेकांना सांभाळून घेतात. कुटुंब असो... घराची जबाबदारी असो.. मुलांची किंवा इतर गोष्टी..नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. पण जेव्हा प्रश्न उत्पन्नाचा येतो, तेव्हा काही जोडप्यांमध्ये वाद होताना दिसून येतात. अनेक आर्थिक गणितं जुळत नसल्याने जोडप्यांमध्ये मतभेद होताना दिसतात. जर तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्याही उत्पन्नात मोठा फरक असेल, किंवा जर पैशासंबंधीचे वाद असतील, तर 'या' मार्गांनी तुम्ही सोडवू शकता..


 


जोडप्यांमध्ये वेळ आणि पैशाचाही मोठा प्रश्न, मतभेद..


आर्थिक असमानता हे नात्यात संघर्ष आणि वेगळे होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. प्रत्येकजण आपल्या पैशाबद्दल संवेदनशील आणि मुक्त आहे. किती खर्च करायचा? किती बचत करायची? याबाबत कुणाचा हस्तक्षेप त्याला आवडत नाही, पण या गोष्टींचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नातेसंबंधातील जोडप्यांमधील दैनंदिन दिनचर्या, खाण्यापिण्यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद तर होतातच, पण दोघेही काम करत असतील तर कधी कधी वेळ आणि पैशाचाही मोठा प्रश्न बनतो. विशेषतः जेव्हा उत्पन्नातील तफावत जास्त असते. पैशांवरून वाद अनेकदा वैयक्तिक हल्ल्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, थोडे समजून घेऊन आपण या गंभीर परिस्थितीला सहजपणे सामोरे जाऊ शकता.


 


पगारातील तफावत जोडप्यांमध्ये संवेदनशील मुद्दा बनतो


नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये तणावाचे प्रमुख कारण म्हणजे पैसे. अशी अनेक जोडपी आहेत जी पगारातील तफावत सारख्या संवेदनशील मुद्द्यांना हात घालतात आणि हेच नातेसंबंधातील तणावाचे सर्वात मोठे कारण बनते. या तणावाचा सामना करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला खूप मदत करू शकतात.


 


भाषेची काळजी घ्या


पैशावरून तुमचा कधी वाद झाला तर रागावू नका, असे काही बोलू नका की तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. युक्तिवाद करताना माझे पैसे, तुमचे पैसे असे शब्द वापरू नका. हे जोडीदाराच्या मनात लाज आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम करतात.


 


मोकळेपणाने संवाद साधा


पैशाच्या विषयावर मनमोकळेपणाने चर्चा करून अनेक समस्या सोडवता येतात. तुमच्या पगाराबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लाज किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर ती तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. स्वतः काहीही विचार करू नका, जोडीदाराचा सल्ला घ्या. जर तुमचा पगार कमी असेल तर अनावश्यक खर्च थांबवा, कारण हे देखील भांडणाचे एक मोठे कारण आहे. आपण शक्य तितकी बचत कशी करू शकता, याबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करा.



कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका


तुम्हाला घर, कार किंवा तसं काही घ्यायचं असेल तर असे निर्णय एकट्याने घेऊ नका, तर तुमच्या जोडीदारालाही त्यात सहभागी करून घ्या. एकट्याने निर्णय घेऊन तुमच्या पगाराची उधळपट्टी करू नका. या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पैशांवरील वाद बऱ्याच अंशी सोडवू शकता.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : क्वालिटी टाईम... भावना समजणे...अन् 'या' सवयी नात्यात आणतात गोडवा! जोडीदार अक्षरश: भाळेल


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )