Relationship Tips : प्रत्येकाच्याच आयुष्यात एक चांगलं, विश्वासाचं आणि हेल्दी रिलेशन (Healthy Relationship) असणं खूप गरजेचं आहे. कोणतंही नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. यामुळे, तुमचं नातं अधिक घट्ट होत जातं. जर एखाद्या नात्यात विश्वास नसेल तर ते नातं फार काळ तर टिकत नाहीच. पण, त्याचबरोबर त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो.

  


प्रत्येक नात्यात सुरक्षित जागा असणे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जेणेकरून दोघांनाही (Partner) नात्याचा त्रास होणार नाही. आणि दोघांना स्वातंत्र्य मिळेल. अनहेल्दी रिलेशनशिपच्या  अशाच काही लक्षणांबद्दल या ठिकाणी आम्ही अधिक माहिती दिली आहे या संदर्भात जाणून घेऊयात. 


अस्वास्थ्यकर संबंधांची काही लक्षणं 



  • जर तुम्ही तुमच्या नात्यात भीतीने राहात असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या (Life Partner) इच्छेनुसार सर्व काही करत असाल, तर समजून घ्या की तुम्ही एका अनहेल्दी नातेसंबंधात आहात.

  • तुमच्या अपेक्षेनुसार सर्व काही करूनही तुमचा पार्टनर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही.

  • बर्‍याच वेळा असे घडते की, तुम्ही तुमच्या जोडीदाराला इम्प्रेस (Impress) करण्यासाठी किंवा खूश करण्यासाठी काही खास गोष्टी करता. पण, त्या गोष्टीचे कौतुक करण्याऐवजी तुमचा पार्टनर तुम्हाला डिमोटिव्ह करायला लागतो किंवा त्याला हे सर्व आवडत नाही असं म्हटलं तरी चालेल. हे एका अनहेल्दी नातेसंबंधाचे (Unhealthy Relationship) लक्षण असू शकते.

  • अनहेल्दी नातेसंबंधात (Unhealthy Relationship) असताना तुम्ही तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांना भेटणे हळूहळू बंद केले तर हळूहळू तुम्हाला त्या नात्याचा कंटाळा येईल. तुमच्या जोडीदाराच्या आनंदासाठी तुम्हाला सुरुवातीला हे सर्व रोमँटिक वाटेल, परंतु काही काळानंतर तुम्हाला तुमच्या मित्रांची आणि कुटुंबाची गरज नक्कीच जाणवेल.

  • नातेसंबंधात (Relationship), जेव्हा तुम्हाला वारंवार आपण या व्यक्तीसाठी योग्य नाही असं वाटत राहिलं तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात खूप वाईट होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही एका अनहेल्दी नातेसंबंधात राहात आहात. जे तुमच्यासाठी घातक आहे.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Parenting Tips : मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतर्क व्हा; तुमच्या मुलांना आजपासून 'या' चांगल्या सवयी लावा