मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता का? करत असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू (बौद्धिक क्षमता) कमी होतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते सुस्त राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
37 ते 73 या वयोगटातील 5 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं. संशोधनादरम्यान सलग 5 वर्षांसाठी या 5 लाख व्यक्तींच्या जीवनशैलीवर लक्ष ठेवण्यात आलं. सोबतच त्यांची बुद्धीमत्ता आणि स्मृतीही तपासण्यात आली.
संशोधनातील 93 हजार व्यक्ती, जे दररोज 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करतात, त्यांच्या मेंदूची क्षमता अगोदर कमी होती. मात्र नंतर आयक्यू कमी होण्यास सुरुवात झाली.
असंच एक संशोधन 3 तास टीव्ही पाहणाऱ्यांवर करण्यात आलं होतं. त्यांचीही बौद्धिक क्षमता कमी असल्याचं समोर आलं. मात्र संगणकावर काम करणाऱ्यांचा मेंदू शार्प असतो, असं समोर आलं.
टीप : ही माहिती संशोधनाच्या आधारावर देण्यात आलेली आहे. एबीपी माझा याबाबत पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2017 09:18 PM (IST)
रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू (बौद्धिक क्षमता) कमी होतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -