या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये मिळेल.
जिओ फोनसाठी नोंदणी कशी कराल?
- Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल.
- keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकण्याचा पर्याय दिला जाईल.
- नोंदणी करताच तुम्हाला Thank You असा मेसेज येईल.
- सोबतच तुमच्या मोबाईलवर हा मेसेज येईल आणि कंपनीकडून तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल, असं सांगितलं जाईल.
जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आहे. जो रिलायन्सकडून मोफत दिला जाईल. अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. मात्र हे 1500 रुपये तुम्हाला तीन वर्षांनी परत मिळतील.
हा फोन खरेदी केल्यानंतर महिन्याला 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड 4G डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.
जिओ फोन कसा आहे?
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन.
फीचर्स काय असतील?
फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
संबंधित बातमी :