Exercise to Reduce Belly Fat : शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने पोटाची चरबी वाढते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat ) कमी करायची असेल तर तुम्ही हे सोपे आसन ट्राय करू शकता. 


मालासन
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मालासन करू शकता. या आसनामुळे पोट आणि कमरेच्या भागातील चरबी कमी होते. तसेच पोटदुखी आणि गॅस यासारख्या समस्या या आसनामुळे कमी होतात. 
असे करा मालासन
हे आसन करण्यासाठी गुडघे दुमडून पायांवर बसावे. आता दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा करा. दोन्ही हातांचे कोपरे नमस्कार मुद्रेतच गुडघ्यांवर ठेवा. दररोज सकाळी 10 मिनीट हे आसन केल्यानं तुमच्या पोटाची चरबी कमी होईल


भुजंगासन :
सर्वप्रथम जमीनीवर पालथे झोपा. 
हनुवटी छातीला टेकवा 
कपाळ जमिनीला टेकवा. 
हाताचे पंजे छातीजवळ ठेवा. त्यानंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन कमरेपपासूनचा भाग वर उचला. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा. 
दररोज पाच वेळा हे आसन केल्याने तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha