Rakshabandhan 2024 : आज रक्षाबंधन आहे, पण त्याच्याच सोबत आज तिसरा श्रावणी सोमवारही आहे. ज्यामुळे अनेकांचा उपवासही असतो. जिथे आज देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे. यासोबतच श्रावणातील सोमवारही यंदा रक्षाबंधनच्या मुहूर्तावर येत आहे. शिवाय दरवर्षी रक्षाबंधनाला पौर्णिमा असते. अशात, जर तुम्ही यानिमित्त उपवास करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ तुम्ही बनवू शकता. जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी, जी तुम्ही अवघ्या काही मिनिटात बनवून पाहुण्यांना किंवा स्वत: खाऊ शकता...


 


सणासुदीच्या निमित्ताने खाद्यपदार्थांचा एक वेगळाच आनंद 


रक्षाबंधन हा सण सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. याशिवाय आज श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आणि पौर्णिमा देखील आहे. यानिमित्ताने अनेकजण राखीच्या सणाचा उपवास करणार आहेत. सणासुदीच्या निमित्ताने खाद्यपदार्थांचा एक वेगळाच आनंद असतो, मात्र उपवासामुळे यावेळी अनेकांना विविध प्रकारचे पदार्थ चाखता येणार नाहीत. तसेच रक्षाबंधननिमित्त घरी पाहुण्यांची वर्दळ असते. अशात उपवास करणाऱ्या पाहुण्यांसाठी काय तयारी करायची हा मोठा प्रश्न आहे. जर तुम्हालाही प्रश्न पडत असेल, तर या रक्षाबंधनाच्या उपवासासाठी तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी-



साहित्य


1/2 कप साबुदाणा
4 कप दूध
4 चमचे साखर
1/4 टीस्पून
वेलची पावडर
1/2 कप पाणी


बनवण्याची पद्धत


खीर बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा पाण्यात धुवून गाळून घ्या.
यानंतर साबुदाणा 2 तास पाण्यात भिजत ठेवा.
या काळात ते जवळजवळ सर्व पाणी शोषून घेईल आणि साबुदाण्याचा आकार मोठा होईल.
आता एका जड तळाच्या पॅनमध्ये मध्यम आचेवर दूध गरम करा.
दुधाला उकळी आली की, त्यात भिजवलेला साबुदाणा घाला. ते अर्धपारदर्शक आणि मऊ होईपर्यंत शिजवा, 
सुमारे 10-15 मिनिटे, वारंवार ढवळण्याची खात्री करा.
नंतर त्यात साखर घाला आणि विरघळू द्या. गॅस कमी करून वेलची पूड घाला.
दूध घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहावे. यास अंदाजे 5-7 मिनिटे लागतील.
आता गॅस बंद करा आणि तयार केलेली साबुदाणा खीर सर्व्हिंग बाऊलमध्ये घाला.
यानंतर, चिरलेल्या बदामांनी सजवा आणि गरम किंवा थंड सर्व्ह करा.




हेही वाचा>>>


Rakshabandhan 2024 : रक्षाबंधनला दिसाल सुंदर, हेवी मेकअप आवडत नसेल, तर 'असा' No Makeup लुक ट्राय करा...


 


 


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )