Raksha Bandhan 2022 : सण, समारंभ, उत्सव आणि व्रतवैकल्यांनी भरलेल्या अशा श्रावण (Shravan 2022) महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात आणखी एक महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे रक्षाबंधनाचा. बहिण-भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. भावाला राखी बांधण्यासाठी माहेरवाशीण बहिण भावाकडे जाते आणि त्याला ओवाळते. तर, भाऊ बहिणीला छानशी भेटवस्तू देऊन कायम तिला सुरक्षित ठेवण्याचं वचन देतो. याच शुभ सणाचा शुभमुहूर्त नेमका कधी याविषयी बरेच समज-गैरसमज आहेत. तर याच शंकेचं निरसन आपण करणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

  


रक्षाबंधन केव्हा करावे?


याविषयी अनेकांचे समज-गैरसमज आहेत. याचं कारण असं की, गुरूवार दि.11ऑगस्ट रोजी सकाळी 10: 41 पासून श्रावण पौर्णिमा चालू होते. आणि ती शुक्रवारी (ता. 12) रोजी सकाळी 07:08 वाजता संपते. याच दरम्यान सकाळी 10:41 ते रात्री 08:53 भद्रायोग/विष्टी करण आहे. या काळात शुभकार्य केले जात नाही.


रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त :


या संदर्भात पंचवटी नाशिक येथील कुलकर्णी गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकापती रावणाला त्याची बहिण शूर्पणखा हिने भद्रा (भद्रा - शनीची बहीण) काळात त्याला राखी बांधली आणि वर्षभरात रावणाचा अंत झाला त्याला बहिणीचे रक्षण करता आले नाही अशा अनेक कथा आहेत. म्हणून मग तस असेल तर आपल काय असा प्रश्न अनेक भगिनींना पडला असेल पण चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे हे पहाणे गरजेचे असते.तो त्यादिवशी चांगला म्हणजे पाताळावर आहे म्हणून दोष नाही.वास्तूशांती, लग्न, मुंजी,या सारखे रक्षाबंधन हे शुभकार्य नसून तो सामाजिक उत्सव असल्याने त्याला वेळ पाहाण्याची गरज नसते म्हणून दिवसभरात आपल्या सोयीने केव्हाही रक्षाबंधन करता येईल. पण त्यातूनच पाहिल्यास, दुपारी 12:31 ते 03:31, 05:00 ते 05:30, सायं.06:31 ते 08:37 या वेळेत  करावे.


राखी बांधताना म्हणावा हा श्लोक :


येन बद्धो बलीराजा,दानवेंद्रो महाबला | तेन त्वामभिबंधामि,रक्षे मा चल मा चल   | असे म्हणावे.


महत्वाच्या बातम्या :