White Hair Remedies: आजकाल अगदी कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. अकाली पांढर्‍या होणाऱ्या केसांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. कमी वयातच पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे लोकांना अनेक प्रकारचे टोमणे देखील ऐकायला लागतात. पांढऱ्या केसांमुळे इतका ताण घेण्याची गरज नाही. आजघडीला बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या प्रचंड वाढली आहे. अशा वेळी, केसांना कलर करण्यासाठी लोक बाजारात मिळणारे रंग वापरतात. याऐवजी काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.


खरे तर, आपली अस्वस्थ जीवन हे या समस्येचे सर्वात मोठे कारण आहे. कधीही उठून खाणं, पुरेशी झोप न घेणं, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. या सगळ्या समस्यांसोबतच सध्या प्रदूषणाची समस्याही सामान्य झाली आहे, ज्याचा आपल्या केसांवर आणि त्वचेवर देखील गंभीर परिणाम होतो. त्याचबरोबर केस पांढरे होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तणाव. कामाचा आणि सध्याच्या एकूण परिस्थितीचा ताण हा आपल्या रोजच्या जीवनावर पडतो आहे. मात्र, काही घरगुती उपाय वापरून आपण आपले केस नैसर्गिकरीत्या काळे ठेवू शकता.



  1. दही आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्या. यानंतर या पेस्टमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याने केसांना मसाज करा. आठवड्यातून तीनदा या तेलाने केसांना मसाज करा. त्याचा परिणाम काहीच दिवसांत तुम्ही स्वतः पहाल.

  2. कांद्याच्या रसाने स्काल्पला मसाज करा. याच्या नियमित वापराने तुमचे केस काळे तर होतीलच, पण गळणेही कमी होईल.

  3. कढीपत्त्यात बायो- अ‍ॅक्टीव्ह गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. कढीपत्ता बारीक वाटून, तुम्ही नेहमी वापरत असलेल्या तेलात मिसळा आणि आठवड्यातून एकदा हे तेल केसांना लावा आणि दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :