Air Conditioner Side Effect : कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आजकाल अनेकजण उन्हाळ्यात एअर कंडिशनरचा (AC) वापर करतात. घर आणि ऑफिसमध्ये एसी बसवणे ही काळाची गरज बनली आहे. पण काही लोकांना दिवसभर एसीमध्ये बसण्याची सवय लागली आहे. अगदी थोड्या वेळासाठी जरी उष्णतेचा सामना करावा लागला तर त्यांना अस्वस्थ व्हायला होतं. एसीमुळे कडक उन्हापासून आराम तर मिळतोच पण दिवसभर एसीमध्ये राहिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या नेमक्या कोणत्या आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


एसी हवा आणि कमी आर्द्रता असलेल्या वातावरणात राहिल्याने आपली त्वचा कोरडी होते, डोकेदुखी होऊ शकते आणि श्वसनाचे आजारही होऊ शकतात. जास्त एअर कंडिशनिंगमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घ्या.


कोरडी त्वचा :


जास्त वेळ एसी वापरल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी जास्त पाणी प्यावे आणि मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. 


थकवा जाणवणे : 


एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यास जास्त थकवा जाणवू शकतो. एसीमध्ये आर्द्रता खूप कमी असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होते. यामुळे थकवा जाणवतो. एसीच्या थंड हवेमुळे रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच, एसीमध्ये ताजी हवा नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवते ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो आणि जास्त थकवा जाणवतो. 


डोकेदुखी :


जे लोक जास्त वेळ वातानुकूलित वातावरणात राहतात त्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. एसीमध्ये ओलावा जास्त असल्याने डोकेदुखी होते. त्यामुळे एसीचा वापर करा पण  जास्त काळ एसी वापरू नका. 


श्वसनाच्या समस्या :  


एअर कंडिशनरमध्ये (AC) जास्त वेळ राहिल्याने श्वासोच्छवासाच्या समस्या जसे की, नाक बंद होणे, घसा खवखवणे यांसारख्या समस्या उद्भवतात. एसीची हवा खूप कोरडी आणि थंड असते जी नाक आणि घशासाठी नुकसानकारक असते. 


तर, या समस्या तुम्हाला उद्भवू नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर वेळीच एसीचा वापर कमी करणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?