Benefits of Peach : कोरोनाचा (Covid19) संसर्ग अजूनही जगभरात वेगाने पसरतोय. अशा वेळी आपण आपल्या आरोग्याची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जीवनसत्त्व आणि फळांचे तसेच भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, पीच (Peach) फारंच फायदेशीर आहे. पीच जरी उन्हाळ्यात जास्त मिळत असले तरी आजकाल सर्वच ऋतूत सर्व फळे मिळतात. पीच बाहेरून पिवळा आणि लाल रंगाचा असतो. पीचमध्ये बदामासारखे बी असते. पीच हे शरीरासाठी सर्वात फायदेशीर फळांपैकी एक आहे. पीचमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. पीचमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जाणून घ्या तुम्हाला पीचचे कोणते पाच फायदे आहेत.
पीच खाण्याचे फायदे :
1. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करा -
पीच शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पीच खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हंगामी रोग टाळण्यासाठी, तुम्ही फळांमध्ये पीच खाणे आवश्यक आहे.
2. वजन कमी करा -
पीच हे वजन कमी करण्यासाठी देखील चांगले फळ आहे. पीचमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते. नाश्त्यात पीच खाल्ल्यास दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागत नाही. भूक लागल्यावर तुम्ही पीच खाऊ शकता.
3. किडनी निरोगी ठेवा -
पीच खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. पीचमध्ये पोटॅशियम असते जे तुमच्या किडनीसाठी खूप फायदेशीर असते. पीच तुमच्या मूत्राशयासाठी साफ करणारे एजंट म्हणून काम करते. पीच खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाहीत.
4. डोळ्यांचे आजार दूर -
डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी पीच खाणे देखील फायदेशीर आहे. पीचमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए बनवते. डोळयांतील पडदा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे.
5. कॅन्सरचा धोका कमी होतो -
पीच खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो. पीचमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरपासून तुमचे संरक्षण करतात. केमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी पीच देखील काम करते हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha