Parenting Tips : बदलत्या वातावरणामुळे सध्याच्या काळात मुलांचे (Children) संगोपन करणे कठीण झाले आहे. आजकाल वाढती महागाई आणि बदलती जीवनशैली (Lifestyle) यामुळे आई-वडील (Parents) दोघांनाही नोकरी करावी लागते. कामाच्या वाढत्या दबावामुळे, लोक सहसा आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांना वेळ देऊ शकत नाहीत.


अनेकदा नोकरी (Job) करणाऱ्या पालकांमुळे पालक आपल्या मुलांकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुले पालकांपासून दूर जाऊ लागतात आणि त्यामुळे ते अनेकदा चुकीच्या मार्गावर जातात. जर तुम्ही देखील वर्किंग पालक असाल तर आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर नोकरी करणाऱ्या पालकांनी त्यांच्या मुलांच्या (Children) योग्य संगोपनासाठी केला पाहिजे.


सकाळी लवकर उठणे


पालक आणि मुलांनी यासाठी सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून, तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एका दिवसात स्वतःसाठी खूप वेळ मिळतो. तुमच्या मुलाबरोबर शेअर करण्यासाठी ही वेळ निवडा. शाळेच्या वेळेपूर्वी मुलाला वेळ द्या. यामुळे मुलाच्या सवयी आणि त्याचे आरोग्य दोन्ही सुधारेल. मुलाबरोबर बसून योगासन करा, त्यांना निसर्गाशी जोडा. यातून मुलामध्ये निसर्गाशी नाते जोडण्याचे संस्कार विकसित होतात.


तुमच्या मुलाला आठवड्यातून एक पूर्ण दिवस द्या


आठवड्यातून एक संपूर्ण दिवस तुम्ही तुमच्या मुलाला देणं गरजेचं आहे. या दरम्यान त्यांच्या आवडीचे जेवण बनवा. त्यांना बाहेर कुठेतरी एकत्र घेऊन जा. त्यांच्याबरोबर एखादा चांगला चित्रपट पाहा किंवा मुलाच्या आवडीचे कोणतेही कार्य जसे की,  चित्रकला, नृत्य, क्राफ्ट एकत्र बसून करा. यामुळे मूल तुमच्याशी आध्यात्मिकरित्या जोडले जाईल. ते त्यांच्या आवडी-निवडी तुमच्याबरोबर शेअर करतील. 


दिवसातून अर्धा तास आपल्या मुलांचे लक्षपूर्वक ऐका


लहान मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक मिनिटाला ते प्रश्न विचारत असतात. अशा वेळी चिडचिड न करता शांतपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मुलांंचं लक्षपूर्वक ऐका. यामुळे मुलांना तुमच्याशी जोडलेले वाटेल आणि त्यांचे विचार शेअर करण्यासाठी तुमच्याशिवाय ते इतर कोणाकडेही जाणार नाहीत.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील