Babies Cries Causes : लहान मुलांचं रडणं हे फार सामान्य आहे. हट्ट पुरे झाले नाहीत, एखादी वस्तू दिली नाही, आवडीचं खाणं नसेल तर अशा अनेक कारणांवरून लहान मुलं रडतात. पण, जर तुमचं बाळ सतत रडत असेल तर त्यामागचं कारण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण मुलांचे सतत रडणे हे फक्त आजारच नाही तर अनेक कारणांमुळे असू शकते. यापैकी पाच मुख्य कारणे आहेत. चला जाणून घेऊयात मुलांच्या रडण्यामागची कारणे काय असू शकतात...
 
1. कपडे घट्ट असू शकतात


अनेक वेळा घट्ट कपडे घातल्यानंतर मुलं रडायला लागतात. या कपड्यांमुळे त्यांना अस्वस्थ वाटते आणि ते जोरजोरात रडू लागतात. त्यामुळे मुलांनी नेहमी सैल सुती कपडे घालावेत.
 
2. आईची अयोग्य जीवनशैली


आई जे काही खाते त्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. जर आई जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न खात असेल तर त्याचा परिणाम मुलांवर दिसून येतो. मूल दूध प्यायल्यावर त्याला या गोष्टी सहन कराव्या लागतात. यामुळे त्याला पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो आणि मूल रडू लागते.
 
3. अति आहार देणे


अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत कुटुंबातील सदस्य मुलांना गरजेपेक्षआ जास्त दूध पाजतात. त्याच वेळी, काहीवेळा घाईघाईने मुलांना खाऊ घालणे देखील जास्त प्रमाणात आहार घेण्यास कारणीभूत ठरू शकते. यामुळे मुलांना पोट फुगणे आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
4. हाडांची हालचाल 


लहान मुलाची हाडे अतिशय नाजूक असतात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ही हाडे सटकण्याचा धोका जास्त असतो. अशा समस्या सहसा उद्भवतात जेव्हा कोणीतरी अचानक मुलाला हात किंवा मान धरून उचलतो. या कारणास्तव मुलांबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे. मुलाचे हाड जागेवरून निसटले की तो न थांबता रडत राहतो.
 
5. लहान मुलांच्या आजारामुळे


जर एखादे मूल रोज संध्याकाळी एकाच वेळी रडत असेल तर त्याला पोटशूळ रोग होण्याची शक्यता असते. या आजारात लहान मुलांना पोटात दुखते आणि खूप वेदना होतात. बहुतेक मुले तीन महिन्यांपासून या आजाराने ग्रस्त असतात. या आजारात मुले अनेक तास रडत राहतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी