Can Indians Buy House in Pakistan: भारतात (India) असे अनेक लोक आहेत जे पूर्वी पाकिस्तानी (Pakistan) नागरिक होते, आज ते भारतीय नागरिक म्हणून भारतात राहत आहेत.  भारतात असे अनेक मोठे चित्रपट कलाकार आणि क्रीडापटू झाले आहेत ज्यांचे पूर्वज पाकिस्तानचे होते. ज्यांचे वडिलोपार्जित घर आजही पाकिस्तानात आहे. सध्या पाकिस्तानात भारतीय घर खरेदी करू शकतो का?  ज्याप्रमाणे अनेक भारतीयांनी परदेशात घरं खरेदी केली आहेत. त्याचप्रमाणे एखादा भारतीय पाकिस्तानात घर खरेदी करू शकतो का? घर खरेदी करायचं असेल तर कोणत्या परवानग्या लागणार आहेत. जाणून घेऊया ...


पाकिस्तानात घर खरेदीचे काय नियम आहेत?



परदेशी नागरिक पाकिस्तानात मालमत्ता खरेदी करू शकतो का, याबाबत पाकिस्तानच्या कायद्यात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानातील जमीन आणि मालमत्तेची परकीय मालकी 1947 च्या परकीय चलन नियमन कायदा (फेडा) आणि 1951च्या पाकिस्तान नागरिकत्व कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते. या कायद्यांनुसार, पाकिस्तानी नागरिकांसह परदेशी नागरिकांना राजनैतिक मिशन, परदेशी कंपन्या आणि संयुक्त उपक्रम यासारख्या विशेष परिस्थितीशिवाय पाकिस्तानात मालमत्ता खरेदी करता येत नाही. जमीन व मालमत्तेवरील परकीय मालकी एकूण जमिनीच्या 1/8 % क्षेत्रापुरती मर्यादित आहे. परंतु शेतजमिनीवर कोणतेही बंधन नाही आहे.


परदेशी नागरिकांना पाकिस्तानात मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील?


-पाकिस्तानी नागरिकाव्यतिरिक्त परदेशी नागरिकाला पाकिस्तानात मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्याला सर्वप्रथम ज्या राज्याच्या स्थानिक प्राधिकरणावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार आहे, त्या राज्याच्या स्थानिक प्राधिकरणाकडून परमिट घ्यावे लागेल. 


-या परमिट परमिटची किंमत अंदाजे 2,000 डॉलर आहे, ज्याचे दर 6 महिन्यांनी रिन्यु करणे आवश्यक आहे. 


-यानंतर गृह मंत्रालयाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावे लागणार आहे.


-त्याचवेळी पाकिस्तान इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्टची (फेरा) मान्यता पाहिजे.


- पासपोर्ट आणि व्हिसा, तसेच मालमत्ता खरेदी करण्यासाठी आपण वापरत असलेल्या पैशांचा पुरावा.


- देशाचे पाकिस्तानशी चांगले राजकीय संबंध असतील तरच भारतीयांना पाकिस्तानात घर खरेदी करता येणार आहे.



पाकिस्तानात घरं खरेदी करणं काही सोपं नसलं तरी कठीण देखील नाही आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली तर तुम्ही देखील पाकिस्तानात घर खरेदी करु शकता. राजकीय संबंध असलेल्या देशांनाच पाकिस्तानमध्ये घर घेण्याची परवानगी आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Giorgia Meloni : इटलीचा चीनला 'दे धक्का', चीनच्या महत्वाकांक्षी BRI प्रकल्पातून इटली बाहेर; भारताला दिलासा देणाऱ्या या निर्णयामागे 'हे' आहे मोठं कार