Omicron Variant Alert : कोरोना व्हायरसने (Corona Virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही या कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांनी अनेकांना बळी बनवले आहे. त्याचबरोबर या विषाणूमुळे मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या सगळ्यामध्ये कोविड-19चे अनेक नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. जो प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने लोकांना त्रास दिला आहे. त्याच वेळी, अनेक रुग्णांमध्ये अशी तक्रार देखील दिसून आली आहे की, त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी केली, मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, त्यांना ओमायक्रॉनची सगळी लक्षणे दिसत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया ओमायक्रॉनपासून बचावाचे उपाय...
लसीकरण करणे आवश्यक आहे
कोरोना आणि त्याचा नवा प्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटपासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण अवश्य करा. कोरोनाची लस तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकते. अशा परिस्थितीत घाबरून न जाता प्रत्येकाने कोरोनाची लस नक्कीच घेतली पाहिजे.
मास्क वापरणे थांबवू नका
कोरोनापासून स्वतः बचाव करण्यासाठी मास्क सर्वोत्तम उपाय असल्याचे म्हटले जाते. तुम्ही N95 मास्क, कापडी मास्क आणि सर्जिकल मास्क घालू शकता. त्याच वेळी, डबल मास्किंग देखील एक चांगला पर्याय आहे. ऑफिसमध्ये, घरी, बाहेरच्या लोकांना भेटताना अशा अनेकवेळी मास्क घाला आणि मास्क वेळोवेळी बदलत राहा.
सोशल डिस्टंन्स पाळा
ज्या प्रकारे कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत, अशा परिस्थितीत प्रत्येकाने योग्य सोशल डिस्टंन्सची काळजी घेतली पाहिजे. घराबाहेर, दुकाने, ऑफिस, मॉल सर्वत्र वावरताना एकमेकांपासून योग्य अंतर ठेवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...