Non Dairy Calcium Rich Foods: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडांचे गंभीर नुकसान होऊ शकते. आपलं संपूर्ण शरीर हे हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते, म्हणून ते निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे.


कॅल्शियम कमी झाल्यास हाडे कमकुवत आणि तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खात नसाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण बाकीच्या अनेक अशा गोष्टी आहेतू, ज्यामधून तुम्हाला सहजपणे कॅल्शियम मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.


शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी काय खावे? असा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. तर डेअरी उत्पादने ही कॅल्शियमचे मजबूत स्त्रोत आहेत. पण ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत त्यांचे काय? भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ञ आणि आहारतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेअरी उत्पादने हाडे मजबूत करण्याचा एकमेव मार्ग नाही. तर कॅल्शियमचे अनेक स्रोत आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. यामध्ये गाजर, मसूर डाळ, तीळ, सोयाबीन  यासारख्या अनेक पदार्थांमधून तुम्हाला कॅल्शियम मिळते. 


गाजर रस


एक ग्लास गाजर रस (सुमारे 6 गाजर) आणि 50 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. तर एका ग्लास गाईच्या दुधात फक्त 240 मिलीग्राम कॅल्शियम असते.


मसूर आणि बीन्स


राजमा, चणे, काळी मसूर, हरभरा आणि सोयाबीन यासारख्या कडधान्या कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. त्यामध्ये प्रति 100 ग्रॅम 200 मिलीग्राम कॅल्शियम असते. चांगली गोष्ट अशी आहे की ते उकळवून कोशिंबीर म्हणूनही खाऊ शकतात.


पांढरे आणि काळे तीळ


पांढरे आणि काळे तीळ कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. 10 ग्रॅम तिळात सुमारे 140 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही रोज दोन ते तीन चमचे तीळ खाऊ शकता.


टोफू


जर तुम्ही दूध आणि दही खात नसाल तर टोफू तुमच्यासाठी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. असे मानले जाते की 100 ग्रॅम टोफूमध्ये सुमारे 350 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. पनीर आणि टोफू यामध्ये फरक आहे. पनीर दुधापासून बनवले जाते. तर टोफू सोयापासून बनवले जाते.


सोयाबीन


सोयाबीनमध्ये कॅल्शियम तसेच प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास हाडे निरोगी राहण्यास मदत होते. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 63 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.


हिरव्या पालेभाज्या


सध्या थंडीचा हंगाम असून या दिवसात हिरव्या पालेभाज्यांचे भरपूर उत्पादन होते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी काळे आणि ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय लेडीफिंगर कॅल्शियमचा खजिना देखील आहे.