Navratri Beauty Tips: शारदीय नवरात्रीला सुरू झाली आहे, अशात देशात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत, कुठे देवीचं जागरण, गोंधळ, तर कुठे गरबा, दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशात अनेकांना आपण सर्वात सुंदर दिसावं असं वाटतं. जर तुम्हालाही तुमच्या घराजवळील कीर्तनात किंवा मंदिरातील पूजेमध्ये सर्वात सुंदर दिसायचं असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फेस पॅक आणला आहे, जो तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. तुमच्या चेहऱ्यावरील चमक पाहून तुमच्या मैत्रीणीही त्याचे रहस्य विचारू लागतील.
चेहऱ्यावर चमक तर येईलच, डागही निघून जातील
आज आम्ही ज्या फेसपॅकबद्दल सांगणार आहोत, त्या फेसपॅकमुळ तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येईलच पण तुमच्या त्वचेवरील सर्व घाण आणि डागही निघून जातील. एवढेच नाही तर दिवसभराचा थकवाही नाहीसा होईल. ही रेसिपी तुमच्या चेहऱ्यावर एवढी चमक देईल की गरब्याला आलेल्या सर्व महिला तुमच्या सौंदर्याचे रहस्य विचारू लागतील. विलंब न लावता, चेहऱ्यावर चमक आणणारी हा फेसपॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बेसन - 2 चमचे
तांदूळ पीठ - 1 टीस्पून
हळद - 1/2 टीस्पून
कोरफड - 1 टीस्पून
कच्चे दूध - 1/2 वाटी
असा फेसपॅक तयार करा
- सर्व प्रथम, एक वाटी घ्या आणि वर नमूद केलेले सर्व घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा.
- आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा आणि २० मिनिटे सुकण्यासाठी सोडा.
- वेळ संपल्यानंतर, पेस्ट चेहऱ्यावर 5 मिनिटे हलक्या हाताने घासून काढून टाका आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.
- चेहऱ्यावर एक लखलखीत ग्लो येईल, जे तुम्हीच पाहाल.
- तुम्ही हा उपाय प्रत्येक दुसऱ्या दिवशी ट्राय करू शकता.
आश्चर्यकारक फायदे मिळतील!
हा फेस पॅक लावल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील. आपण नेहमी पाहत आलोय, बेसन हे आज नव्हे तर आजी-आजोबांच्या काळापासून वापरले जाते. तुमची आई सुद्धा म्हणेल की बेसनाची पेस्ट लावा म्हणजे तुमचा चेहऱ्यावर तेज येईल. कारण त्वचेशी संबंधित समस्यांसाठी बेसन फायदेशीर आहे. जसे की ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, चेहऱ्यावर चमक आणते, मुरुम आणि इत्यादी कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा प्रसार रोखते. त्यामुळे तुम्हीही हा उपाय वापरून तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता.
हेही वाचा>>>
Beauty Tips: नवरात्रीत हवाय बॅकलेस ग्लो..! पाठ अभिनेत्रीप्रमाणे चमकणारी हवी! सौंदर्य तज्ज्ञांच्या 'या' टिप्स येतील कामी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )