Navratri 2023 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) विशेष महत्त्व आहे. देवी दुर्गेच्या या उत्सवाची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. देवीचा हा उत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या उत्सवात नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते. देवीची खऱ्या मनाने पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. तसेच भक्त नऊ दिवस उपवास करतात. उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तुम्ही बटाट्याचं सेवन करू शकता. याचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारच्या रेसिपी वापरून पाहू शकता. या पदार्थांमुळे तुमचं पोटही भरलेलं राहील आणि शरीरात ऊर्जा देखील टिकून राहील. या सोप्या रेसिपी कोणत्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बटाटा रायता
बटाटा हा उपवासात खाल्लेला एक लोकप्रिय पदार्थ आहे. तुम्ही नवरात्रीच्या उपवासात बटाट्याचा रायता खाऊ शकता. ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे. हा बटाट्याचा रायता बनवण्यासाठी, उकडलेले बटाटे मॅश करा, नंतर फेटलेल्या दह्यात बटाटे घाला. आता त्यात काळी मिरी, खडे मीठ मिक्स करून हिरव्या कोथिंबीरीने सजवा. तुमची डीश तयार आहे.
बटाट्याची टिक्की
संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही स्वादिष्ट बटाट्याच्या टिक्की खाऊ शकता. ही डीश करण्यासाठी, मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये सैंधव मीठ घाला. नंतर पॅन गरम करा आणि त्यात तेल घाला. आता टिक्की दोन्ही बाजूंनी तळून घ्या. तुम्ही ही बटाट्याची टिक्की चहाबरोबर देखील खाऊ शकता.
बटाट्याचा हलवा
जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही बटाट्याचा हलवा देखील करून पाहू शकता. हे बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तुपात तळून त्यात दूध, साखर घालून हे मिश्रण चांगले मॅश करा. तयार झाल्यावर सुक्या मेव्याने सजवा.
दही बटाटा
उपवासात तळलेले बटाटे खायचे नसतील तर उकडलेल्या बटाट्यात दही मिसळून त्यात किंचित मीठ टाकावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि भाजलेले जिरे पूड देखील वापरू शकता. तुमची स्वादिष्ट दही बटाटा रेसिपी तयार आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा! जाणून घ्या