Mother's Day 2022 : यावर्षी 8 मे रोजी जागतिक मातृदिन (Mother's Day) साजरा केला जाणार आहे. हा दिवस आईसाठी, आपल्या आयुष्यातील आईचे महत्त्व समजून घेण्यासाठी साजरा केला जातो. अशावेळी आईसाठी नेमकं कोणतं सरप्राईज द्यायचं हा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊयात...
बागकामात आईला मदत करा
तुमच्या आईला जर बागकामाची आवड असेल तर यापेक्षा दुसरा उत्तम संधी नाही. तुम्ही आईला एक छानसं रोपटं, फूल देऊन हा दिवस साजरा करू शकता. त्याचबरोबर बागेत एखादं रोपटं लावून, त्याला पाणी घालून, ताणतणावांपासून मुक्त करू शकता. यातून तुम्ही आईची आवड जोपासता आहात हे दिसून येईल.
छंद जोपासण्यात मदत करा
रोजच्या व्यस्त जीवनशैलीतून आईलासुद्धा आणि आपल्यालासुद्धा आपला छंद जोपासता येत नाही. अशा वेळी तुम्ही आईबरोबर नृत्य, गाणं, योगासने, वाद्य वाजवणे इत्यादी एक्टिव्हिटी करू शकता. यामुळे आईच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.
एकत्र बसून सिनेमा पाहा
तुम्ही जेवताना एकत्र बसून एखादा छानसा सिनेमा किंवा नाटकदेखील पाहू शकता. यातून तुमच्या फॅमिलीबरोबर छानसा वेळदेखील घालवता येईल. तसेच अनेक विषयांवर चर्चा होतील, संवाद होतील.
आईचं आवडतं ठिकाण निवडा
या मदर्स डे ला तुम्ही आईला एखाद्या छानशा ठिकाणी घेऊन जा. निसर्गाच्या सानिध्यात रमायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे तुमच्या घरापासून काही अंतरावर असलेलं एखादं ठिकाण शोधा आणि आईला फिरायला घेऊन जा. थोडक्यात रोजच्या वातावरणापासून आईला थोडा ब्रेक द्या.
स्वयंपाकात मदत करा
आपल्या आईची नेहमी तक्रार असते की, आपण त्यांना स्वयंपाकात मदत करत नाही. अशा वेळी आईला खुश करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. आईच्या एखादा आवडीचा पदार्थ तुम्ही स्वत: तयार करा. किंवा आईला स्वयंपाकात तुम्ही मदत करा. असे केल्याने आईच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.
महत्वाच्या बातम्या :