Monsoon Travel : रिमझिम पाऊस...दाटलेलं धुकं.....सोबत जोडादाराचा हातात हात...ओठांवर पावसाची गाणी..क्या बात है..! अशा ठिकाणी जायला कोणाला आवडणार नाही. सध्या मान्सूनचं देशासह महाराष्ट्रात आगमन झालंय. महाराष्ट्रात तर मान्सून अगदी आल्हाददायक वातावरण घेऊन आला आहे. त्याच्या येण्याचे निसर्ग तसेच आजूबाजूचा परिसर अगदी प्रफुल्लित झाला आहे. अशा वेळी जर तुम्हाला जोडीदाराला घेऊन पावसाचा आनंद घ्यायला जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर तुम्हाला चक्क स्वर्गसुखाचा अनुभव मिळेल, तसेच तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबियांसाबत आयुष्यातील सर्वोत्तम वेळ घालवाल... जाणून घ्या त्या ठिकाणाबद्दल...



देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात


पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरणं आलंच... कारण, महाराष्ट्रातच अशी अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही रिमझिम पावसात मनमुराद फिरू शकता. त्यापैकी महाबळेश्वर पासून अवघ्या काही अंतरावर असलेले 'पाचगणी' हे महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे, जिथे पावसाळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. पाचगणीला येणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही विमान, रेल्वे किंवा रस्त्याने पाचगणीला पोहोचू शकता. तुमच्यासाठी रस्त्याने किंवा रेल्वे हा स्वस्त आणि सोपा प्रवास असू शकतो.




पाचगणीत भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं


पाचगणी हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य इतके लोकप्रिय असते की देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. परदेशी पर्यटकही पावसाळ्यात येथे भेट देण्यासाठी येतात. सहलीदरम्यान ही ठिकाणे एक्सप्लोर करा-


पहिला दिवस- 3 दिवसांच्या सहलीत, तुम्ही एक अद्भुत आणि आश्चर्यकारक ठिकाण एक्सप्लोर करू शकता. सहलीच्या पहिल्या दिवशी, तुम्ही टेबल लँड, सिडनी पॉइंट, कास पठार सारखी प्रेक्षणीय ठिकाणे पाहू शकता. ही ठिकाणे काही अंतरावर आहेत. त्यामुळे भेट देण्यासाठी वेळ लागू शकतो.


दुसरा दिवस- ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण मोकळा वेळ मिळेल. अशात तुम्ही देवराई पॉइंट, पारसी पॉइंट आणि भिलार धबधबा यांसारखी अद्भुत ठिकाणे पाहू शकता. पारसी पॉइंट आणि भिलार धबधब्याच्या आजूबाजूला वसलेले हिरवळीचे सौंदर्य तुम्ही जवळून अनुभवू शकता. पावसाळ्यात ही ठिकाणे अनेकदा ढगांनी आच्छादलेली असतात.




पाचगणीत राहण्याची ठिकाणं


पाचगणी हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि मनमोहक हिल स्टेशन आहे. त्यामुळे येथे राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स अगदी कमी खर्चात सहज उपलब्ध आहेत. अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉटेजमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जाते. येथे तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थ, चायनीज फूड, मेक्सिकन आणि कोरियन खाद्यपदार्थांची चव चाखता येईल. याशिवाय पाचगणीमध्ये तुम्ही स्ट्रीट फूडचा आस्वाद घेऊ शकता.




मुंबई ते पाचगणी कसे पोहचाल?



रेल्वेने - मुंबईहून पाचगणीला जाण्यासाठी कोणतीही थेट ट्रेन नाही , पण काही थांबे आहेत जिथे तुम्ही उतरू शकता जसे की खेड किंवा चिपळूण किंवा सातारा, आणि तेथून बस किंवा टॅक्सीने पाचगणीला जाता येते. उर्वरित अंतर सुमारे 30 - 40 किमी आहे. महाबळेश्वर- पाचगणीला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक साताऱ्यातील वाठार आहे, जे 61.6 किमी अंतरावर आहे, सातारा ते मुंबईला जोडणाऱ्या अनेक गाड्या आहेत. मुंबई ते सातारा हा रेल्वे प्रवास गाड्यांनुसार बदलू शकतो. सुपरफास्ट किंवा स्पेशल ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी सुमारे 4 तास लागू शकतात. प्रवासी ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी 7 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.  एकदा तुम्ही साताऱ्याला पोहोचलात की तुम्ही 1 तास 30 मिनिटांत रस्त्याने महाबळेश्वरला पोहोचू शकता. त्यानंतर तिथून 19.2 किमी अंतरावर पाचगणी आहे. महाबळेश्वर ते पाचगणीला पोहचण्यासाठी साधारण 32 मिनिटे लागू शकतात. 


विमानाने - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, 120 किमी अंतरावर, महाबळेश्वरला सर्वात जवळचे विमानतळ आहे. मात्र, मुंबई ते पुणे हे अंतर जेमतेम 150 किमी आहे. त्यामुळे, जर तुम्ही मुंबईहून महाबळेश्वरला जात असाल तर तुम्ही आणखी पर्याय शोधू शकता.


रस्त्याने - सायन-पनवेल द्रुतगती मार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती मार्ग आणि नंतर NH4 चा वापर करा. त्यानंतर वाई-सुरूर रोड, वाई- पाचगणी -महाबळेश्वर रोड आणि वाई-पाचगणी रोडने भीम नगर, पाचगणी येथे तुमच्या डेस्टीनेशनकडे जा. मुंबई-पाचगणी हे अंतर सुमारे 244 किलोमीटर असून ते 5 तासांत कापता येईल


 


 


 


हेही वाचा>>>


Travel : 'मुंज्या' चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील 'ते' सुंदर गाव! मान्सून पिकनिकसाठी Best ऑप्शन, कलाकरांनाही भुरळ


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )