Monkeypox Case In India : जगभरात कोरोना महामारीनंतर आता मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox Virus) उद्रेक होताना दिसत आहे. भारतातही मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालाय.  राजधानी दिल्लीमध्ये रविवारी मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती देत, दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट केलं. भारतामध्ये हा चौथा मंकीपॉक्सचा रुग्ण होता. पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर सातत्याने मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत असल्याचे समोर आलेय. जगभरात जवळपास 17 हजार पेक्षा जास्त मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. सत्तर पेक्षा जास्त मंकीपॉक्स रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जगभरात कोरोनानंतर मंकीपॉक्सची भीती पसरली आहे. 


डॉ. ईश्वर गिलाडा यांनी मंकीपॉक्स विषाणूबाबात माहिती दिली आहे.  मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणूमुळे होतो, जो स्मॉलपॉक्ससारखाच असतो. परंतु हा आजार सहसा सौम्य असतो. हा एक झुनोटिक संसर्ग आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये किंवा एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्यामध्ये पसरू शकतो. मंकीपॉक्स काही प्रमाणात कांजण्यासारखेच आहे. जागतिक आरोग्य संघटनाने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. 


मंकीपॉक्सचा उष्मायन काळ कांजण्यांच्या तुलनेत थोडा जास्त असतो, म्हणजे पाच ते 12 दिवस आहे. मंकीपॉक्समध्ये, संसर्ग झाल्यानंतर 1-5 दिवसांच्या आत पुरळ उठतात. हे सुरुवातीला चेहऱ्यावर दिसते, तुमच्या शरीराच्या इतर भागात पसरते. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद पाळत ठेवणे आवश्यक आहे. कारण ते एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरण्यापासून प्रतिबंधित करते.  झुनोटिक संसर्ग टाळण्यासाठी संक्रमित प्राण्यांशी असुरक्षित संपर्क थांबवावा.  मंकीपॉक्सची लागण झालेल्या प्राण्यानवरील निर्बंध लागू केले जावेत.


मंकीपॉक्स 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित -
जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.