Merry Christmas 2021: हा ख्रिश्चनांचा प्रमुख सण असला तरी काळाच्या ओघात सर्व धर्म आणि वर्गातील लोक तो मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यादरम्यान लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन ख्रिसमसचा आनंद लुटतात. या सणानिमित्त अनेकांच्या घरात रंगीबेरंगी दिवे आणि खेळण्यांनी सजलेला एक ख्रिसमस ट्री पाहायला मिळतो. परंतु, घरांमध्ये ख्रिसमस ट्री का सजवला जातो? त्याचा नाताळाशी काय संबंध आहे? यासंबंधित अनेक रंजक गोष्टीवर एकदा नजर टाकूयात.
ख्रिसमस ट्रीबद्दल आढळणारी पहिली पौराणिक कथा 723 मधील आहे. जर्मनीमध्ये काही लोक सुशोभित केलेल्या ओकच्या रोपाखाली मुलाचा बळी देणार असल्याची माहिती सेंट बोनिफेसला कळले. सेंट बोनिफेसनं परमेश्वराचे नाव घेतले आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने झाडाचे दोन तुकडे केले. जिथे त्याने झाड तोडलं, तिथे पुन्हा एक झालं उगवलं. हे झाड देवाचं प्रतीक असल्याचं सेंट बोनिफेसन लोकांना सांगितलं.
ख्रिस्ती धर्माचे सोळाव्या शतकातील सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी या झाडाला घरी आणून सजवण्यास सुरुवात केली. वास्तविक एकदा एकदा मार्टिन ल्यूथर 24 डिसेंबरच्या संध्याकाळी एका बर्फाच्छादित जंगलात फिरत होते. जिथे त्यांना हे सदाहरित झाड दिसलं. चंद्राच्या प्रकाशानं या झाडाच्या फांद्या चमकत होत्या. त्याचं सौंदर्य पाहून भूललेले मार्टिन लूथर ते झाड घेऊन घरी आले आणि घरात हा सदाहरित वृक्ष लावला. या झाडाला मेणबत्यांनी सजवलं आणि झाडं प्रकाशित केलं.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच ख्रिसमस ट्री किंवा सदाहरित असणाऱ्या वृक्षाला जास्त महत्त्व देण्यात आले होते. ख्रिश्चन समुदायामध्ये ख्रिसमस ट्री आपल्या घरांमध्ये सजवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की हे ख्रिसमस ट्री त्यांचे वाईट डोळे आणि भूतांपासून संरक्षण करते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Merry Christmas 2021 : आज नाताळाचा उत्साह, 'मेरी ख्रिसमस' असं म्हणण्यामागचं कारण काय?
Christmas 2021 : 25 डिसेंबर म्हणजे, ख्रिसमस; पण का साजरा करतात? सांता कोण? जाणून घ्या