Koffee With Karan 8: दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या शोच्या आठव्या सीझन आता संपणार आहे. या शोच्या फिनाले एपिसोडचा प्रोमो नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये ओरी (Orry), कुशा कपिला (Kusha Kapila), तन्मय भट्ट (Tanmay Bhat), दानिश सेट (Danish Sait) आणि सुमुखी सुरेश (Sumukhi Suresh) हे करणसोबत विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. 


ओरी म्हणाला, "मी चिटर आहे"


कॉफी विथ करण या शोच्या सोशल मीडियावरील प्रोमोमध्ये ओरी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये करण जोहर ओरीला विचारतो, "तू सिंगल आहेस की तू कोणाला डेट करत आहेस?" करणच्या या प्रश्नाला ओरी उत्तर देतो, "मी पाच लोकांना डेट करत आहे. मी चिटर आहे." ओरीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, ओरी म्हणतो, 'लोक माझ्यावर मिम्स तयार करतात आणि मी पैसे कमावतो.'


प्रोमोमध्ये कुशा कपिला, तन्मय भट्ट, दानिश सेट आणि सुमुखी सुरेश हे  करणची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तन्मय भट्ट करणला म्हणतो की,"या सीझनमध्ये तू शोमध्ये इतके फिल्टर्स लावले आहेत की तू आता शोचे नाव बदलून फिल्टर कॉफी विथ करण ठेवावे."


पाहा प्रोमो:




प्रोमोमध्ये दिसत आहे की, इन्फ्लुएंसर दानिश सेटने करणला विचारले की, "तुला सर्वात जास्त दुःख झाले असेल जेव्हा झोया अख्तरने द आर्चीजमध्ये स्टार किड्सला लॉन्च केलं.' नंतर करण स्वत:लाच रोस्ट करुन म्हणतो,"मी माझा शो सोडू शकतो आणि तुम्ही हा शो आता सांभाळा."


दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर  या सेलिब्रिटींनी कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली. आता या शोचा आठवा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Zeenat Aman: 'सत्यम शिवम सुंदरम-2' मध्ये या अभिनेत्रीनं साकारावी रुपाची भूमिका; झीनत अमान यांनी व्यक्त केली इच्छा