दाढीवाल्या तरुणीची गिनीज बुकात नोंद
हरनाम कौर ही पॉलीसिसटिक ओवरी सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात पुरुष संप्रेरक(मेल हार्मोन) अधिक प्रमाणात निर्माण झाल्याने एखाद्या स्त्रीला दाढी आणि मिसरुढ फुटतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(सर्व फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच तिने एका आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्येही रॅम्पवॉक केला. गुरुवारी तिच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
शीख धर्माचे पालन करताना तिने दाढी मिश्या राखण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिची जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
तिला या अजारामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे ती सांगते. ती जेव्हाही घरातून बाहेर पडत असे, तेव्हा लोक तिला विचित्र नजरेतून पाहात. प्रत्येकजण तिला दाढी आणि मिश्या काढण्याचा किंवा ते लपवण्याचा सल्ला देत. मात्र, तरीही तिने या आजाराला स्वत: चा कमकुवतपणा होऊ दिला नाही.
दाढी आणि मिसरुढ फुटलेल्या एका 24 वर्षीय ब्रिटीश शीख मॉडेल कम कॅम्पेनरची गुरूवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हरनाम कौर असे या तरुणीचे नाव असून ती सध्या दक्षिण-पूर्व इंग्लडमधील बर्कशायरमध्ये राहते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -