Makar Sankranti 2022 Rashifal : मकर संक्रांतीच्या दिवशी 'तीळ गूळ घ्या, गोड बोला' असं म्हणत सर्वांना तिळ आणि गूळ वाटले जाते. या वर्षी मकर संक्रांतीचा (MAKAR SANKRANTI ) सण पंचांगानुसार  पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला म्हणजेच  14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी तीळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.  मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्याने घरात धनसंपत्ती येते तसेच तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. जाणून घेऊयात कोणत्या राशीने काय दान करावे...


मेष
मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ, शेंगदाणे आणि तीळ यांचे दान करावे. तुम्ही कपडे देखील दान करू शकता.


वृषभ 
वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र, दही आणि तीळ दान करावे. असे केल्याने त्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. 
 
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी मूग डाळ, तांदूळ आणि घोंगडी दान करावी. शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चादर आणि छत्र्याही दान करू शकता.


कर्क 
कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ, चांदी आणि पांढरे तीळ दान करावे.  तसेच कर्क रास असणारे लोक लोक दूध किंवा तूप देखील दान करू शकतात.
 
सिंह
या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा कारण ते खूप फायदेशीर असेल. या दिवशी तुम्ही तांबे आणि गहू दान करू शकता.


कन्यारास
कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी, ब्लँकेट आणि हिरवे कपडे दान करावे. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल.


तूळ 
तूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र, साखर आणि ब्लँकेट दान करावे.
 
वृश्चिक 
वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ, लाल वस्त्र आणि तीळ दान करावे. याचा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होईल.


धनु
मकर संक्रांतीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र, पिवळी मसूर, हळद यांचे दान करावे.


मकर
मकर रास असणाऱ्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट, काळे तीळ आणि तेल दान करावे.


कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना काळे उडीद, काळे कपडे आणि काळे तीळ दान करण्याचा सल्ला दिला जातो. 
 
मीन 
मीन राशीच्या लोकांनी रेशमी वस्त्र, हरभरा डाळ, तीळ आणि तांदूळ दान करावे. 


मकर संक्रांतीच्या या दिवशी तुम्ही या दिलेल्या माहितीप्रमाणे तुमच्या राशीनुसार दान केले तर तुमच्या जीवनात खूप आनंद येऊ शकतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


संबंधित बातम्या


Makar Sankranti 2022 : 'तीळ गूळ घ्या, गोड बोला', यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला; जाणून घ्या शुभ मुहुर्त आणि महत्व


Wan for Sankranti 2022 : 'वाण' द्यायचा विचार करताय? जाणून घ्या सर्वांना उपयोगी पडेल असं 'वाण'