Maha Kumbh 2025 Travel: हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठे महत्त्व आहे. 13 जानेवारीपासून महाकुंभाला सुरूवात झाली आहे. यंदा हा मेळा प्रयागराज मध्ये आयोजित करण्यात आला असून याच्या पहिल्याच दिवशी येथील 44 घाटांवर भाविकांचा महापूर पाहायला मिळाला होता. कुंभमेळा निमित्त प्रयागराजमध्ये पोहचण्यासाठी अनेक लोक ट्रेन किंवा बसने प्रवास करण्याचा विचार करत आहेत. मुंबईतील लाखो लोकही कुंभमेळ्याला जात आहेत. ज्यांनी प्रयागराजला जाण्यासाठी प्लॅन केला असेल, अशा लोकांसाठी, हा लेख उपयुक्त ठरेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही मुंबईहून प्रयागराजची सहल सहज कशी पूर्ण करू शकता?


मुंबई ते प्रयागराज विशेष ट्रेन, पण लक्षात ठेवा...


भारतीय रेल्वे मुंबईहून अशा अनेक विशेष गाड्या चालवत आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रयागराजला सोपे झाले आहे. त्यामुळे तुम्हीही येथे जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तिकीट बुक करू शकता. सध्या प्रयागराज महाकुंभला जाण्यासाठी नियमित आणि साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. लक्षात ठेवा की अनेक गाड्यांना प्रयागराजला जाण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे, ट्रेनचे तिकीट बुक करण्यापूर्वी, ट्रेन किती वेळ येईल हे लक्षात ठेवा. यासोबतच प्रयागराजला जाणाऱ्यांनी त्यांची ये-जा तिकिटे अगोदर बुक करावीत. अनेकदा लोक प्रयागराजला जाण्यासाठी तिकीट बुक करतात आणि परतीचे तिकीट बुक करत नाहीत. त्यांना वाटते की भारतीय रेल्वे विशेष गाड्या चालवत आहे, त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल, परंतु त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागते.


मुंबईकरांसाठी बसने प्रवास करणे योग्य की अयोग्य?


प्रयागराज मुंबईपासून अंदाजे 1,407.3 किमी अंतरावर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एकूण 22 ते 25 तास लागतात. अशा स्थितीत बसने जाणे मुंबईकरांना सोयीचे होणार नाही. इतके लांबचे अंतर बसने कापणे हे मोठे काम आहे. त्यामुळे ट्रेननेच प्रवास करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ट्रेनने लवकर पोहोचाल आणि सुविधाही चांगल्या आहेत जर तुम्हाला महाकुंभशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असतील तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.


कारने मुंबईहून प्रयागराजला जाणे योग्य की अयोग्य?


स्वत:च्या गाडीने जाणेही तुम्हाला जड वाटेल. कारण तुमचा पेट्रोल आणि टोलचा खर्चही यात जाईल. याशिवाय, तुम्हाला खूप वेळ गाडी चालवावी लागेल, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्हाला लाँग ड्राईव्हची सवय नसेल तर तुम्ही तुमच्या कारमध्ये जाणे टाळावे. याशिवाय दुसरे कारण म्हणजे यावेळी प्रयागराजमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला पार्किंग आणि ट्रॅफिकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 


हेही वाचा>>>


Mahakumbh 2025: कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून खास संधी! विशेष गाड्यांचे नियोजन, सुविधा, सर्व माहिती येथे जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )