Chandra Grahan Lunar Eclipse 2021: ज्योतिष शास्त्रानुसार, वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारीत सव्वादोननंतर सुरु झाले आहे. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहणासोबत वर्षातील पहिले ग्रहणसुद्धा आहे.
हे चंद्रग्रहण एक अनोखी खगोलीय घटना आहे, कारण हे एकाच वेळी सुपरमून, पूर्ण चंद्रग्रहण आणि रेड ब्लड मून (Red Blood Moon) असेल. त्याव्यतिरिक्त हा दिवस वैशाख मासची पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा देखील आहे. या घटना आणि योगायोगाने हे चंद्रग्रहण विशेष झाले आहे. 2021 वर्षातील हा दुसरा सुपरमून असून या पौर्णिमेला फ्लावर मून असे म्हणतात. या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षातील सर्वाधिक कमी असल्याने चंद्र 15 % मोठा आणि 30% तेजस्वी दिसेल.
चंद्रग्रहण केव्हा आणि कोठे होईल?
चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल. हे ग्रहण दुपारी 02:17 वाजता होईल आणि संध्याकाळी 07:19 मिनिटांनी संपणार आहे.
चंद्रग्रहण कुठे दिसेल?
हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल तरी भारतात सामान्यच दिसणार आहे. चंद्रग्रहणावेळी चंद्र भारताच्या बर्याच भागात पूर्व क्षितिजाच्या खाली असेल. अशा परिस्थितीत लोकांना चंद्रग्रहण भारतातून व्यवस्थित पाहता येणार नाही. हे चंद्रग्रहण काही मिनिटांकरिता पश्चिम बंगाल आणि पूर्व ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये काही अंशी दिसू शकेल.
हे चंद्रग्रहण मुख्यतः अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या काही भागात पूर्णपणे दृश्यमान असेल. म्हणजेच हे चंद्रग्रहण दक्षिण कोरिया, बांगलादेश, जपान, सिंगापूर, उत्तर व दक्षिण अमेरिका, बर्मा आणि फिलिपाईन्स मधील संपूर्ण चंद्रग्रहण म्हणून लोक पाहू शकतात.