Long Weekends In 2024 : नवीन वर्षात काय करायचं? हे आपण नेहमीच  अगोदर ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. खासकरुन सुट्टी कधी असणार? आपल्याला ट्रीपसाठी कधी जाता येईल? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. 2023 मध्ये अनेक उत्सव शनिवारी किंवा रविवारी आले होते. त्यामुळे अनेकांना सुट्यांचा (Weekends)  आनंद घेता आला नाही. मात्र, 2024 सुट्याच सुट्या आल्या आहेत. शिवाय, 3-4 सुट्या अनेकदा एकदम आल्या आहेत. सुट्यांचे दिवस कसे असतील जाणून घेऊयात...


तामिळनाडूमध्ये १५ जानेवारीला पोंगल साजरा होणार 


पोंगल हा सण तामिळनाडू (Tamilnadu), आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये या सणाचे महत्व सर्वात जास्त आहे.  तुम्ही दक्षिण भारतात राहत असाल तर तुम्हाला पोंगलसाठी सुट्टी नक्कीच मिळेल. जर तुम्हाला पोंगलसाठी सुट्टी मिळाली तर तुम्ही लाँग विकेंडवर जाऊ शकता. 15 जानेवारी म्हणजेच सोमवारी पोंगल साजरा करण्यात येणार आहे. 


मकर सक्रांतीमुळे मिळणार लागोपाठ 3 सुट्या 


महाराष्ट्र आणि इतर राज्यात देखील मकर सक्रांत मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. दरवर्षी मकर सक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. मात्र, यावर्षी मकर सक्रांत 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी हा सण सोमवारी आला आहे. त्यामुळे लागोपाठ 3 सुट्या मिळू शकतात. तुम्हाला मित्रांसमवेत अथवा कुटुंबियांसोबत ट्रीपसाठी जायचे असेल तर तुम्ही योजना आखू शकता. 14 जानेवारीला रविवार असणार आहे. तर 13 जानेवारीला शनिवार आला आहे. तुम्ही या सुट्यांचा आनंद घेऊ शकता. 


8 मार्चला महाशिवरात्र 


महाशिवरात्र यंदाच्या वर्षी 8 मार्चला असणार आहे. शुक्रवारी महाशिवरात्र असेल. महाशिवरात्रीमुळेही तुम्हाला आराम करता येईल. शिवाय, विकेंडचा आनंद घेण्यासाठी तुम्ही बाहेरही पडू शकता. शिवाय, तुम्ही महशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाच्या निमित्तीने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना भेटी देऊ शकता. 


'गुड फ्रायडे'मुळे मिळू शकतो लाँड विकेंड 


नवीन वर्षात गुड फ्रायदे (Good Friday) 29 मार्चला असणार आहे. शिवाय 31 मार्चलाही सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये मित्रांसोबत ट्रीपला जाण्याचा प्लॅन करु शकता. 3 दिवसांची सुट्टी मिळाल्याने ट्रीपला भरपूर वेळ मिळणार आहे. 


दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन 


नव्या वर्षातील दिवाळी (Diwali) १ नोव्हेंबरला रोजी असणार आहे. यानंतर एक दिवस सोडून रविवार आला आहे. ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे जोरादार सेलिब्रेशन करु शकतात. शिवाय, दिवाळीत येणाऱ्या विकेंडमध्ये तुम्ही आरामही करु शकता. 


गुरुनानक जयंती 


दिवाळीनंतर काही दिवासांनी गुरुनानक जयंती आहे. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असणार आहे. यादिवशी शुक्रवार आहे. तर लगेच 17 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे एक दिवस सोडून सुट्या मिळणार आहेत. 


नवीन वर्षातील ख्रिसमस 


2024 च्या शेवटी 25 डिसेंबरला ख्रिसमसची (Christmas)  सुट्टी मिळणार आहे. 21 डिसेंबरला शनिवार आहे. तर 22 डिसेंबरला रविवार आला आहे. यानंतर 23 डिसेंबरला म्हणजे मंगळवारी सुट्टी आहे. तुम्हाला ख्रिसमसमुळे 5 दिवसांचा मोठा विकेंड मिळू शकतो. शिवाय, वर्षाचा शेवट तुम्ही वेळ काढून साजरा करु शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या 


Makeup Tips : या नवीन वर्षात तुम्हाला वेगळं दिसायचंय? या 5 मेकअप टिप्स ट्राय करा!