Bhiwandi Crime : भिवंडी : वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करत असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. भिवंडी तालुक्यातील चिंबी पाडा परिसरात वीटभट्टी मालकानं आदिवासी मजुरांना आपल्या वीटभट्टीवर विठबिगरी म्हणून ठेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला. वीटभट्टी मालका विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांची वीटभट्टी असून त्याठिकाणी मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार, मुलगा संदीप, सुनील आणि वडील लक्ष्मण सवरा हे मागील 8 वर्षांपासून वीटभट्टीवर मजुरी करत आहेत. त्यासाठी 5 हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन गेला आणि दर आठवड्याला फक्त 800 रुपये इतका कमी मोबदला देऊन राबवून घेत होता. तर इतरत्र कामावर जाण्यास वीटभट्टी मालकाला सांगितल्यावर तुमचे पैसे अजून फिटलं नाहीत, असं धमकावून काम करून घेत असताना त्यांना मारहाण आणि शिवीगाळसुद्धा करत असे. आपली आणि आपल्यासोबत इतर मजुरांची आर्थिक पिळवणूक करत असल्या बाबत मंजू संतोष पवार हिने गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना माहिती दिली.


त्यानंतर संस्थापक विवेक पंडित यांनी  मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वीटभट्टीवर धाव घेत पाहणी केली. त्याठिकाणी मंजू संतोष पवार यांसह दहा आदिवासी मजूर हे वेठबिगार म्हणून काम करत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर याबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मंजू संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीटभट्टी मालक सिद्दीकी शेख या विरोधात अट्रोसिटीसह विठबिगरी कायद्यानं गुन्हा दाखल करण्यात आलं आहेत. तर त्यानंतर विवेक पंडित यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ वेठबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे.


देशाला स्वतंत्र मिळून 76 वर्ष झाली तरीही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी कातकरी समाजातील मजुरांची पिळवणूक होत आहे, हे दुर्दैवी असून अशा मालकांविरोधात कठोर कारवाई करून या मजुरांचं पुनर्वसन करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली आहे. ो