Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर करावे लागेल. हे करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. या कामात एक छोटा कापूरही तुमची मदत करू शकतो. कसा तो वाचा..


घरामध्ये 'अशा' प्रकारे वापरा कापूर 



गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा टाका आणि संध्याकाळी फुलांनी जाळून देवी दुर्गाला अर्पण करा, असे केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे


रात्री स्वयंपाकघराचे काम संपवून चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.


सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळावा. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.


घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळी तुपात भिजवून कापूर जाळावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.


आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाका. त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे. असे केल्याने भाग्य वाढते.


जर तुमचे कोणतेही काम होत नसेल तर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर सतत जाळून ठेवा, तुमचे सर्व रखडलेले काम पूर्ण होतील.


स्नानगृहात कापूरच्या 2-2 पोळ्या ठेवल्यास देवदोष आणि पितृदोष शांत होतात.


रोज सकाळी एका भांड्यात कापूर जाळून मुख्य दरवाजाजवळ ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मकतेचा संचार होतो.


जर घरात अशी खोली असेल, ज्याचा वापर तुम्ही फारच कमी करत असाल तर आठवड्यातून एकदा तरी थोडा कापूर किंवा हवन साहित्य जाळून धुवावे. 


कापूरच्या सुगंधाने तेथील सर्व नकारात्मकता दूर होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :