Horoscope Today, May 21, 2022 : आज श्रवण नक्षत्र आहे. चंद्र मकर राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. वृषभ, कर्क राशीच्या नोकरपेशा लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. तर, सिंह आणि मकर राशीच्या लोकांनी कुणाशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखू शकता. नोकरी बदलण्याचाही विचार करू शकता. काही कामातून पैसे मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अनावश्यक भांडणे आणि वाद टाळा. शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.


वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला काही नवीन सहकारी मिळतील. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. मित्रांच्या मदतीने नोकरीत लाभ होईल. करिअरसाठी इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना काही चांगले पर्याय मिळू शकतात. धन प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात बदल संभवतो. नोकरीत परिस्थिती सुधारेल.


मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. व्यवसाय मंद राहील. कामात निराशा येऊ शकते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. मन अस्वस्थ होईल. स्वावलंबी व्हा. शत्रूंवर विजय मिळेल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. लाभाच्या संधी मिळतील. काही जुन्या मित्रांशी संपर्क साधू शकाल. अनेक फायदेशीर सौदे करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल.


कर्क (Cancer Horoscope) : जमीन आणि घर खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात मंगल कार्यक्रम होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. घरातील ज्येष्ठांकडून धनप्राप्ती होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते.


सिंह (Leo Horoscope) : मन अस्वस्थ होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. बोलण्यात सौम्यता राहील. उत्पन्न वाढेल. अनावश्यक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सहज वागण्याने लोक खूश होतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीला मदत करू शकता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जुने वाद मिटतील.  धार्मिक कार्यात रस वाढेल.


कन्या (Virgo Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील, धार्मिक कार्यात रस वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या. वाहन किंवा घर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कामे वेळेवर पूर्ण होतील. सर्वत्र लाभाची परिस्थिती निर्माण होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये केलेल्या मेहनतीचे फळ पदोन्नतीच्या रूपात मिळू शकते.


तूळ (Libra Horoscope) : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आज संपुष्टात येतील. या राशीच्या नोकरी व्यावसायिकांना सुवर्णसंधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील, तसेच मन अभ्यासात व्यस्त राहील. आज इंटरव्ह्यू देणार असाल, तर यश नक्की मिळेल. भागीदारीत केलेला व्यवसाय यशस्वी होईल. शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : व्यवसायात यश मिळेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. ऋतुबदलामुळे तुमच्या प्रकृतीत थोडेसे चढउतार होऊ शकतात. अतिउत्साही होणे टाळा. स्वावलंबी व्हा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.


धनु (Sagittarius Horoscope) : कौटुंबिक सुखात वाढ होईल. लोक तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. आरोग्य चांगले राहील. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याबाबत सावध राहा. उत्पन्न वाढेल. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अशक्य कामे शक्य करून दाखवाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.


मकर (Capricorn Horoscope) : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. वैवाहिक सुखात वाढ होईल. प्रवासाचा कार्यक्रम बनवता येईल. कामाचा व्याप वाढेल. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. अचानक आर्थिक होऊ शकतो.


कुंभ (Aquarius Horoscope) : विचार केलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल.  वरिष्ठांसमोर बोलल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अनावश्यक राग आणि वाद टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये आज निर्णय तुमच्या बाजूने येईल. नोकरीत सकारात्मक बदल होऊ शकतात. व्यापारात मोठे लाभ होतील.


मीन (Pisces Horoscope) : कुटुंबात मंगल कार्य करता येईल, मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. सावध राहा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. कुठेही फसवणूक होऊ शकते. व्यापारी वर्गाला आज अचानक काही मोठा फायदा होऊ शकतो. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळू शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :