Benefits Of Kashmiri Kahwa : भारतात चहाला (Tea) राष्ट्रीय पेय म्हणून ओळखलं जातं. जवळपास सर्वच भारतीयांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. आपल्या भारतात चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही. चहाप्रेमींसाठी 'चहा' हे प्रत्येक दुःखावर औषध समजलं जातं. चहाप्रेमी लोक दिवसातून किमान 5 ते 7 वेळा चहा पितात. काश्मिरी काहवा (Kashmiri kahwa) हा काश्मीरमधील (Kashmir) पारंपरिक चहा आहे. विविध गरम मसाल्यांपासून हा चहा तयार केला जातो. हिवाळ्यात काश्मिरी काहव्याचे सेवन केल्याने यातील गरम मसाल्यांमधील पोषक गुणधर्म आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आपले संरक्षण करतात. काश्मिरी काहवा एक प्रकारचा हर्बल चहा आहे.


मुळात काश्मिरी काहवा कॅफीन फ्री असल्याने त्याचे आरोग्यासाठी कोणतेही नुकसान नसून उलट अनेक फायदेच आहेत, तर जाणून घेऊयात काश्मिरी काहव्याचे फायदे.  


रोगप्रतिकार क्षमता वाढते 


काश्मिरी काहव्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात त्यामुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. काश्मिरी चहामध्ये व्हिटॅमिन बी असते, जे अनेक आजारांवर उपयुक्त ठरते. 


पचनक्रिया सुधारते


काश्मिरी चहाच्या सेवनामुळे आपली पचनक्रिया सुधारते. शरीरातील बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते. नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी काश्मिरी चहा सर्वोत्तम मार्ग आहे.


हृदयाचे आरोग्य चांगले राहते 




काश्मिरी चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. काश्मिरी चहामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.


सकारात्मक ऊर्जा मिळते 


काश्मिरी चहाच्या सेवनाने मेंदूला पोषक तत्व मिळतात. आपली बुद्धी तल्लख राहते. शरीरातील मरगळ दूर लोटून शरीरात तरतरी येते. सुगंधित काश्मिरी चहामुळे आपला तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. 


सर्दी-खोकल्यावर आराम




काश्मिरी काहवा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते. घशाला खवखव होत असल्यास काश्मिरी चहा प्यावा, त्यामुळे घशाला आराम मिळतो. टॉन्सिल्सच्या त्रासावर हा चहा उपयुक्त ठरतो. 


वजन नियंत्रित राहते 




काश्मिरी चहामध्ये वापरलेल्या पदार्थांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि आपले वजन नियंत्रणात राहते. 


निरोगी त्वचेसाठी गुणकारी 




काश्मिरी चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग या समस्या दूर होतात. त्वचा कोरडी होत नाही. 


चांगली झोप लागते 




काश्मिरी काहव्याचे सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते आणि शांत झोप लागते.


कसा बनवाल काश्मिरी काहवा?


काश्मिरी काहवा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात दालचिनी, छोटी वेलची, केसर, गुलाबाच्या पाकळ्या, 2-3 लवंग, काळीमिरी एकत्र छान उकळवा. आता या मिश्रणामध्ये ग्रीन टी पावडर आणि साखर घाला. त्यानंतर यात थोडेसे सुंठ आणि 1 चमचा मध घाला. हे सर्व चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा. तुमचा गरमागरम सुगंधित काहवा तयार झाला. हा काहवा एका कपमध्ये गाळून घ्या आणि बदाम, पिस्ता, काजूच्या तुकड्यांनी छान सजवा. एक काश्मिरी काहव्याचा घोट तुम्हाला रिफ्रेश करेल. या चहामध्ये गरम मसाले असल्याने दिवसातून एकदाच या चहाचं सेवन करावं ते आरोग्यास फायदेशीर ठरतं. हा काश्मिरी काहवा काश्मीरबरोबरच भारतातही वरदान मानला जातो. थंडीत दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहण्यासाठी रोज प्या काश्मिरी काहवा.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय