Karwa Chauth 2022 Puja : आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिला दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत 13 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारी केले जाणार आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. करवा चौथला गणेशाची, शंकर-पार्वती, करवा माता याशिवाय चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी, पतीच्या संरक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडतात. यावर्षी करवा चौथचा नेमका मुहूर्त कोणता? तसेच पूजा विधीची पद्धत कशी असते हे जाणून घ्या.
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीची सुरुवात : 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 01:59 वाजता
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीचा शेवट : 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 03:08 वाजता
करवा चौथ 2022 मुहूर्त (Karwa Chauth Muhurtha 2022) :
करवा चौथ पूजा मुहूर्त : 13 ऑक्टोबर 2022, सायंकाळी 06:01 - सायंकाळी 07:15 वाजेपर्यंत
कालावधी : 1 तास 14 मिनिटं
चंद्रोदयाची वेळ : 13 ऑक्टोबर रात्री 08:19 वाजता
करवा चौथ 2022 शुभ योग (Karwa Chauth Shubh Yog 2022) :
यावर्षी करवा चौथ अनेक शुभ योगाने साजरी होणार आहे. यावेळी करवा चौथच्या दिवशी सिद्धी योगासह कृतिका आणि रोहिणी नक्षत्रही असतील. शास्त्रानुसार करवा चौथच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत राहील. आणि या दिवशी रोहिणी नक्षत्र असणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा वेळी या विशेष योगांमध्ये केलेली उपासना फार फलदायी असते असे मानले जाते.
सिद्धी योग : 12 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02:21 ते 13 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 01: 55 पर्यंत
रोहिणी नक्षत्र : 13 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 06:41 ते 14 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 08:47 पर्यंत
कृतिका नक्षत्र : 12 वाजता 2022 रोजी सायंकाळी 05:10 ते 13 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 06:41 पर्यंत
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका व्रत (Hartalika 2022) तसेच वटसावित्रीची (Vatsavitri) पूजा केली जाते. तशीच करवा चौथ ही प्रथा उत्तर भारतात फार महत्वाची मानली जाते. तसेच, अलीकडे टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक हिंदी मालिकांमधून करवा चौथच्या व्रताला आणखीनच ग्लॅमर आले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या :