Karva Chauth 2024: असं म्हणतात की, करवा चौथचा उपवास करणे काही सोपे काम नाही... काही स्त्रिया निर्जळी पाण्याशिवाय हे व्रत करतात म्हणजेच दिवसभर उपाशी आणि तहानलेले राहावे लागते. या उपवासात रात्री चंद्र उगवल्यानंतरच काही खातात किंवा पितात. अशा वेळी शरीरातील हायड्रेशन लेव्हल बिघडू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी हायड्रेशन टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पाणी न पिताही दिवसभर हायड्रेट राहू शकता.


 


विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण, पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना


करवा चौथ हा एक सण आहे, जो प्रामुख्याने विवाहित स्त्रिया साजरा करतात. या उत्सवात सकाळपासून चंद्र उगवेपर्यंत उपवास करण्याची परंपरा आहे. यंदा करवा चौथचा उपवास 20 ऑक्टोबरला होणार आहे. हे व्रत निर्जल आहे, त्यामुळे महिला पाणीही पीत नाहीत. ज्यामुळे कोणीही दीर्घकाळ अन्न किंवा पाण्याशिवाय आजारी पडू शकतो. भारतीय मान्यतेनुसार हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते, त्यामुळे मध्यभागी तोडणे देखील अशुभ मानले जाते. करवा चौथच्या काही खास हायड्रेशन टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही करवा चौथचे व्रत सहज पाळू शकाल. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डायटीशियन अक्षता चव्हाण यांनी करवा चौथच्या काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. जाणून घ्या..


 


उपवास करण्यापूर्वी हायड्रेशनसाटी हे करा


नारळ पाणी- उपवास सुरू करण्यापूर्वी नारळ पाणी प्या. हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे जे दिवसभर शरीरात हायड्रेशन राखण्यास मदत करते.


लिंबू पाणी- घरगुती इलेक्ट्रोलाइट पेय बनवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे लिंबू पाणी. यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर मीठ आणि साखर टाकून प्या. यामुळे हायड्रेशन वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.


हर्बल टी- कॅमोमाइल किंवा पुदिन्याचा चहा शरीराला हायड्रेट करू शकतो आणि पचनसंस्थेलाही फायदा होतो. त्यामुळे हे नैसर्गिक चहा प्यायला सुरुवात करा.


फ्रूट इन्फ्युज्ड वॉटर- उपवास करण्यापूर्वी हायड्रेशन आणि व्हिटॅमिनसाठी काकडी, संत्री किंवा पुदिन्याची पाने यांसारखी फळे मिसळलेले डिटॉक्स पेय तयार करा आणि प्या.


आत्तापासून या गोष्टींचे सेवन सुरू केल्यास करवा चौथ व्रताच्या दिवशी फारशी तहान लागणार नाही.



हे खा..


फळे खा - सरगीमध्ये संत्री, काकडी आणि खरबूज यांसारखी पाणचट फळे खा. ही फळे हळूहळू हायड्रेशन सोडतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेट राहते.
दही- तुम्ही दही खाऊ शकता तर ते केवळ हायड्रेट करत नाही तर आतडेही निरोगी ठेवते.
ओट्स- ओट्स पाणी शोषून घेतात आणि दूध किंवा दह्यासोबत खाल्ल्यास हायड्रेशन देऊ शकतात. त्यामुळे सरगीमध्ये ओट्सचा समावेश करू शकता.
चिया सीड्स- या बिया रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवा आणि सरगीमध्ये ओट्स किंवा दही मिसळून खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्मूदी बनवूनही पिऊ शकता.


या गोष्टी खाणे टाळा


मिठाचे सेवन कमी करा - तुमच्या सर्गीमध्ये जास्त खारट आणि मसालेदार अन्न खाणे टाळा, कारण ते तुम्हाला तहान आणि निर्जलीकरण करू शकते.
कॉफी- उपवास करण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करा, कारण यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते, ज्यामुळे शरीरातील डिहायड्रेशन वाढते.


 


हेही वाचा>>>


Food: नोकरदार महिलांनो..आता डब्ब्याची काळजी नाही, 'या' 5 झटपट होणाऱ्या टिफीन रेसिपी बेस्ट ऑप्शन, जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )