Iron Cookware : जुन्या काळात लोक मातीची आणि लोखंडाची भांडी वापरत असत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लोखंडी कढई आणि लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची प्रथा केवळ आपल्या देशातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही आहे. आता लोकांनी स्वयंपाकघरात नॉन-स्टिक भांडी जास्त वापरायला सुरुवात केली असली तरी आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक पुन्हा मातीची आणि लोखंडाची भांडी वापरू लागले आहेत. 


आज आम्ही तुम्हाला लोखंडाच्या कढईत बनवलेले अन्न खाण्याचे फायदे सांगणार आहोत. रोजच्या लोखंडी कढईत अन्न शिजविल्यास त्यापासून शरीराला पुरेसे लोह मिळते. लोखंडी कढईत अन्न शिजविण्याचे फायदे नेमके काय आहेत ते जाणून घ्या.


1- लोहाची कमतरता पूर्ण होते 


लोखंडाच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांपासून सुटका होते. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवावे. लोह कढई लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी खूप मदत करू शकते.  


2- ही नॉन-स्टिक आहे


तुम्ही लोखंडी कढई नॉन-स्टिक म्हणूनही वापरू शकता. यामध्ये कोणतेही सिंथेटिक मटेरिअल वापरले जात नाही. त्यामुळे अन्नापर्यंत कोणतेही रसायन पोहचत नाही. तुम्ही लोखंडी कढईत अगदी कमी तेलातही अन्न शिजवू शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल. 


3- ते खूप गरम असतात-


लोखंडी भांड्यांमध्ये तवा असो किंवा लोखंडी कढई, हे सर्व लवकर गरम होतात. लोखंडी तव्यावर चपाती बनविणे खूप फायदेशीर आहे. एकदा गरम केल्यावर लोखंड बराच काळ गरम राहते. नॉन-स्टिकच्या तुलनेत लोखंडी भांडी जास्त वेळ गरम राहतात.


4- जास्त काळ टिकते-


नॉन-स्टिक भांडी नीट काळजी न घेतल्यास ते लवकर खराब होतात. तर लोखंडी भांडी दीर्घकाळ टिकतात. त्यांची साफसफाई करताना फार काळजी घेण्याचीही गरज लागत नाही. लोखंडी कढई तुम्ही बराच काळ वापरू शकता. 


5- तुलनेने स्वस्त असतात 


लोखंडी भांडी इतर भांड्यांपेक्षा खूपच स्वस्त आहेत. तुम्ही ते अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. या प्रकारची भांडी स्वच्छ करणे देखील सोपे आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha