IRCTC New Year Trip : डिसेंबर (December) महिना सुरू होताच प्रत्येकजण नवीन वर्षाचे प्लॅन्स (New Year Plans) बनवू लागतो. वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर संपायला अवघे काही दिवसच बाकी आहेत, अशावेळी, नवीन वर्षाचा काय प्लॅन आहे? ही एकच गोष्ट प्रत्येकाच्या तोंडी असते, पण अनेकदा बजेटचे नियोजन करताना वर्ष संपते, आणि नववर्षाची वेळ कधी जवळ येते हेच कळत नाही. पण निराश होऊ नका, कारण हे नवीन वर्ष तुम्ही गोव्यात साजरे करू शकता. तेव्हा तुमच्या मित्रांसोबत गोव्याची योजना करा आणि या IRCTC टूर पॅकेजचा लाभ घ्यायला विसरू नका. या पॅकेजची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही EMI द्वारेही याचे हफ्ते भरू शकता. 


पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष काळजी
आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. एसी वाहनांतून प्रवाशांना नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.



'या' टूर पॅकेजबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
-IRCTC च्या या गोवा टूर पॅकेजमुळे पर्यटकांना विमानाने प्रवास करता येणार आहे.
-हे स्वस्त टूर पॅकेज लखनौपासून सुरू होईल.
-IRCTC च्या इतर टूर पॅकेजप्रमाणेच राहण्याची आणि जेवणाची सुविधाही मोफत दिली जाईल.
-पर्यटकांना थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल
-नाश्ता आणि जेवणही दिले जाईल.



टूरमध्ये 'या' सुविधांचा समावेश
फ्लाइट तिकीट (लखनौ-गोवा-लखनौ)
प्रस्थान (Departure) - 10 डिसेंबर
गोव्यात 3 रात्रीचा मुक्काम
नाश्ता आणि रात्रीचे जेवण
30 सीटर एसी बसमध्ये प्रवास 
प्रवास विमा



गोवा टूर पॅकेजची रक्कम
-IRCTC च्या 3 रात्र 4 दिवसांच्या टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसोबत प्रवास करताना एका व्यक्तीला 28,040 रुपये मोजावे लागतील.
-दोन व्यक्तींसोबत राहण्यासाठी एका व्यक्तीला 28,510 रुपये मोजावे लागतील.
-एका व्यक्तीला एकट्या गोव्याला जाण्यासाठी 34,380 रुपये मोजावे लागतील.
-या पॅकेजची चांगली गोष्ट म्हणजे या ट्रिपचे पेमेंट EMI द्वारे देखील केले जाऊ शकते. 
-या टूर पॅकेजबद्दल उर्वरित माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन जाणून घेऊ शकता.


गोव्यातील 'या' ठिकाणी पर्यटकांना नेले जाईल
-बेसिलिका ऑफ बोन जीसस चर्च
-मिरामार बीच
-संध्याकाळी मांडोवी नदी क्रूझ
-उत्तर गोव्यातील बागा बीच
-कँडोलिम बीच
-सिंक्वेरिम बीच आणि स्नो पार्कला भेट


 


संंबंधित बातम्या


IRCTC : रेल्वेत मिळणार आता प्रवाशांच्या आवडीचे तसेच स्थानिक खाद्यपदार्थ , रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा