बीअर पिताय... जरा सावधान!
बीअर अल्कोहोलीक आहे, पण तरीही जगभरातील अनेकजण त्याचे सेवन करतात. बीअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बीअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो.
अल्कोहोलमुळे शरिरातील ग्लूकोजचं प्रमाणही कमी होतं. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे बीअरचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधूमेहाचे विकार होण्याची शक्यता बळावते.
वास्तविक, बीअरमध्ये 5 टक्क्याहूनही कमी म्हणजे 150 कॅलेरी अल्कोहोल असतं. म्हणजे एका 350 ml बीअरच्या बॅटलमध्ये 13 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे बीअरच्या अधिक प्रमाणात सेवनाने इंसुलिनचं शरिरातील प्रमाण वाढून सेंसिटिव्हीटी कमी होते.
त्यामुळे बीअरने शरिरातील साखरेचं प्रमाण लगेच वाढवत नसलं, तरी त्याच्या दीर्घकाळ सेवनाने मधूमेहासारखे गंभीर आजार संभवतात.
अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो.