मुंबई : इंग्रजीत एक म्हण आहे, 'An Apple a day keeps the doctor away' अर्थात 'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा'. हे खरंही आहे आणि अनेकांना माहित आहे. अनेक गुणांनी युक्त सफरचंद सर्व वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरतं. परंतु सफरचंद खाण्याचे नेमके फायदे आणि त्यातील गुण कोणते ते पाहूया.
- दररोज सफरचंद खाल्ल्याने श्वसनसंस्थेचं आरोग्य उत्तम राहतं.
- अॅलर्जी आणि संसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते.
- कोरडा खोकला झाल्यास गोड सफरचंद खाल्ल्याने आराम मिळतो.
- सफरचंदामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहून त्यांची झीज होत नाही.
- संधिवात, सांधेदुखी किंवा गाऊटसारखे आजार असल्यास सफरचंद उकडून खाल्ल्याने फायदा होतो.
- सफरचंदामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेंदूच्या पेशींची झीज होत नाही आणि त्यांचं आरोग्य सुधारतं.
- ताण जास्त वाढला असल्यास सफरचंदाचा आहारत समावेश केल्याने ताण कमी होऊन उत्साह, जोम आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.
- सफरचंदाच्या दररोज खाल्ल्याने मेंदूचे आणि मानसिक अनेक विकारांपासून रक्षण होतं.
- सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास दररोज उपाशीपोटी सफरचंदाला मीठ लावून खाल्ल्याने डोकेदुखी कमी होते.
- सफरचंदाच्या दररोजच्या सेवनाने ताकद वाढते, केसांचं आरोग्य सुधारतं, त्यासोबत तारुण्य टिकून राहण्यास मदत होते.
- सफरचंद नेहमी सालीसकट खावं. तसंच मिठाच्या पाण्यात धुवून त्यानंतर खावं.