Mansoon Fashion : जसा ऋतू बदलत जातो तसेच फॅशन पण बदलत राहते.अनेकांना पावसाळ्यात कशा प्रकारचे कपडे घालावे कळत नाही. पावसाळ्यातील वातावरणामुळे नेमके सैलसर कपडे घालावेत की, नेहमीचेच घालावेत हे लक्षात येत नाही.या विचारात नेमके चांगल्या ठिकाणी किंवा आॅफिसला जाताना कपड्यांच्या बाबत आपली गल्लत होते आणि आपण प्रेझेंटेबल (Presentable) दिसू शकत नाही.अशा वेळी नेमके कोणते कपडे घालावेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


आजकाल तरूणाईचा फॅशन (Fashion) सेन्स बदलताना दिसत आहे. आता सर्व ठिकाणी सैल आणि मोठ्या साईझ चे कपडे घालताना तरुणाई दिसत आहे. स्किनी, टाईट जीन्सला मागे टाकत आता बॅगी जीन्स आणि बॅगी शर्टस तरुण तरुणाईच्या अंगावर पाहायला मिळत आहेत.यात बरेच प्रकार तरूणाईकरता उपलब्ध आहेत. हा लुक पावसाळ्याकरता तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. हल्ली बॅगी पॅन्ट्स आणि बॅगी शर्टस नावाच्या फॅशनला चांगले दिवस आले आहेत. हे कपडे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहज घालू शकता. जीन्स तर घालायची आहे, पण ती घट्ट नको, असा नवा ट्रेण्ड आता आला आहे. खरे तर ही फॅशन खूप जुनी आहे जुन्या काळातल्या हिरो हेरॉइन्स अशा पद्धतीचे ड्रेस चित्रपटातून घालताना दिसत होते आणि मग यातूनच बॅगी क्लॉथ्स ची फॅशन सुरू झाली. आज कॉलेज मधून , डेट वर जाताना किंवा पिकनिक साठी तसेच आॅफिसकरताही बॅगी क्लॉथ्स ला प्राधान्य दिले जाते. आजकाल मोठ-मोठे सेलेब्रिटी देखील बॅगी क्लाॅथ्स घालून फोटो काढताना दिसतात. 


पावसाळ्यात बॅगी जीन्स हा प्रकार चांगलाच सोयीस्कर ठरणारा आहे. कारण या पॅण्ट खूपच सैलसर आणि मोकळ्या- ढाकळ्या असतात. बॅगी जीन्स किंवा बॅगी शर्ट्स खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्ही ऑनलाईन पर्याय नक्कीच ट्राय करून पहा. बॅगी जीन्स चे अनेक विविध प्रकार आकर्षक नावांसहित बाजारात अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहेत. मॉम जीन्स , बॉयफ्रेंड जीन्स ,  डॅड जीन्स , बेली बॉटम जीन्स असे काही प्रकार उपलब्ध आहेत. सोबतच सोशल मीडियावर कोणत्या जीन्स वर कोणते टॉप्स किंवा कोणते शर्ट्स आपण घालू शकतो याचे हजारोंनी व्हिडिओ पाहायला मिळतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेसेंटेबल दिसण्यासाठी बॅगी क्लॉथ्स हा अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच बॅगी जीन्स वर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कुर्ते घालू शकता. इंडो-वेस्टर्न लुक देखील पावसाळ्यात चांगला दिसू शकतो. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Job News: 'या' नोकरीत मिळतो 60 हजार पगार आणि राहण्यासाठी मोफत घर, पण अटी ऐकून...