Acidity : आजकाल धावपळीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे अॅसिडिटी ही सर्वांसाठीच मोठी समस्या बनली आहे. अतिरिक्त पित्त अर्थात अॅसिड आपल्या शरीरात तयार होतं. ज्यामुळे सातत्याने वजन वाढणे, डोकेदुखी, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे, जेवणाची इच्छा न होणे, चक्कर येणे अशा समस्या जाणवू लागतात. अॅसिडीटीमुळं आज अनेक लोकांना जीवघेण्या त्रासाचा सामना करावा लागतोय. अनेकदा तर ही अॅसिडिटी जीवावर बेतण्याची देखील शक्यता असते. कारण अॅसिडिटीमुळं अॅटॅक येण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अॅसिडिटीची वाढती समस्या आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे अॅसिडिटीवर वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.



का होते अॅसिडिटी?
जेवणासाठी वेळ न मिळाल्यामुळे आपण फास्ट फूडसारख्या पदार्थांना प्राधान्य देतो. शरीरातील अॅसिड आणि अल्काईल या दोन घटकांचा समतोल बिघडल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. पाणी कमी पिणे, फास्ट फूड खाणे ही अॅसिडिटीची कारणं आहेत, असं फिटनेस एक्स्पर्ट सांगतात. शेंगदाणे, आईस्क्रीम, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट असे पदार्थ खाणे टाळावेत. उन्हाळ्यात या पदार्थांचं सेवन केल्याने जास्त त्रास होतो.



अॅसिडिटीवरील उपाय
जेवणाच्या वेळेतील अनियमितता हे अॅसिडिटी होण्यामागील प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम निघतो. त्यामुळे डिहायड्रेशनचीही समस्या जाणवते. जास्तीत जास्त पाणी पिणे हा अॅसिडिटीवर चांगला उपाय ठरु शकतो. केळ अॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो. बडिशोप अॅसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जेवणानंतर बडिशोप खाल्याने अॅसिडिटीचा त्रास होत नाही. पाणी पिणं आणि ते योग्य पिणं गरजेचं आहे. पाणी कमी पिल्यानं अॅसिडिटीचा त्रास होतो. अॅसिडिटीपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे.  कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं लगेच आराम मिळतो.
 
(गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)