अॅसिडिटीची वाढती समस्या आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे अॅसिडिटीवर वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
का होते अॅसिडिटी?
जेवणासाठी वेळ न मिळाल्यामुळे आपण फास्ट फूडसारख्या पदार्थांना प्राधान्य देतो. शरीरातील अॅसिड आणि अल्काईल या दोन घटकांचा समतोल बिघडल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. पाणी कमी पिणे, फास्ट फूड खाणे ही अॅसिडिटीची कारणं आहेत, असं फिटनेस एक्स्पर्ट शितल ओक सांगतात.
अॅसिडिटीवरील उपाय
जेवणाच्या वेळेतील अनियमितता हे अॅसिडिटी होण्यामागील प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम निघतो. त्यामुळे डिहायड्रेशनचीही समस्या जाणवते. जास्तीत जास्त पाणी पिणे हा अॅसिडिटीवर चांगला उपाय ठरु शकतो.
शेंगदाणे, आईस्क्रीम, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट असे पदार्थ खाणे टाळावेत. उन्हाळ्यात या पदार्थांचं सेवन केल्याने जास्त त्रास होतो, असं शितल ओक यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ