करीना आणि सैफ लवकरच आई-बाबा बनणार?
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 09:11 AM (IST)
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्यानंतर आता बॉलिवूडची आणखी एक जोडी लवकरचा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. काही वृत्तानुसार, करीना कपूर चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. हे दोघेही लंडनला फिरण्यासाठी गेले होते आणि आता मुंबईत परतले आहेत. मात्र कपूर किंवा खान कुटुंबीयांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. करीना ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी अमृतापासून सैफला एक मुलगा आणि मुलगी आहे. आता करीना कपूरही कपूरही प्रेग्नंट अशून सैफ पुन्हा बाबा बनणार आहे.