How To Make Marriage Certificate : सध्या सोशल मीडिया चाळायला बसलो (Marriage Certificate) की सगळ्यांच्या लग्नाचेच फोटो दिसतात. वेगवेगळ्या पद्धतीचं फोटोशूट, हटके कपडे, प्री-वेडिंग, संगीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पोझ देऊन काढलेले हळदीचे फोटो दिसतात. या 2024 वर्षात लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. डेस्टिनेशन वेडिंग, रॉयव वेडिंगची सध्या क्रेझ आहे. त्यात हनिमून म्हटलं की मालदिव, बाली, मनाली हे फिक्स आहे. मात्र या सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न झाल्यावर मॅरेज सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढलंय का? किंवा तुम्हाला काढायचं आहे का? ते कसं, कुठे काढायचं त्याची प्रक्रिया कशी आहे?, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याच प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत आणि हे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या ठिकाणी कामाला येईल हे देखील सांगणार आहोत.
मॅरेज सर्टिफिकेट कुठे उपयोगी पडतं?
- लग्नानंतर Joint Bank Account उघडायचे असेल तर मॅरेज सर्टिफिकेट द्यावा लागतो.
- पासपोर्टसाठी अर्ज करताना मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असेल.
- लग्नानंतर विमा घ्यायचा असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लावणं गरजेचं असेल.
- जर जोडप्याला एखाद्या देशात ट्रॅव्हल व्हिसा किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करायचा असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागू करावे लागेल.
- लग्नानंतर महिलेला आडनाव बदलायचे नसेल तर विवाह प्रमाणपत्राशिवाय सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही.
- लग्नानंतर राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे.
- कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर बाबींमध्ये मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असेल. लग्नानंतर फसवणूक करून जोडप्यापैकी एक पळून गेल्यास तक्रार दाखल करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट उपयुक्त ठरेल.
-घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट उपयुक्त ठरणार आहे. नोकरीत आरक्षण मिळवण्यासाठी एकल माता किंवा घटस्फोटित महिलांना घटस्फोटाची कागदपत्रे दाखवावी लागतात.
मॅरेज सर्टिफिकेट कसा काढाल?
-कोरोना संकटामुळे विवाह नोंदणीची सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे.
-मॅरेज सर्टिफिकेट फॉर्मसोबत काही महत्त्वाची कागदपत्रेही अपलोड करावी लागतील.
-जोडीदाराचा जन्म दाखला किंवा इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
-जोडीदाराचे आधार कार्ड
-वधू-वरांचे 4-4 पासपोर्ट आकाराचे फोटो
-लग्नाचे 2 फोटो ज्यात वधू-वरांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे
-लग्नाच्या पत्रिकेचा फोटो
-आडनाव बदलण्यासाठी 10रुपयांचा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर लावावा लागतो.
- 10 रुपयांच्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर पती-पत्नीकडून वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दिले जाते.
- तीन साक्षीदारांव्यतिरिक्त वधू-वरांचे आई-वडील किंवा पती-पत्नीयांनीही निबंधक कार्यालयात उपस्थित राहावे.
इतर महत्वाची बातमी-