Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृताचे महत्त्व खूप आहे. यकृत डिटॉक्सिफाय करते आणि शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतं. जर एखाद्याच्या शरीरात यकृत कमकुवत असेल तर शरीरात अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच यकृत निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे, असा सल्लाही तज्ज्ञ देतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला कोणते पदार्थ खाणं आवश्यक आहे हे आज जाणून घेऊयात.
ताजी फळे आणि भाज्यांवर लक्ष केंद्रित करा
यकृत निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी, आपण नेहमी योग्य आहार निवडणे महत्वाचे आहे. शिळे आणि खराब झालेले अन्न खाल्ल्याने यकृत खराब होऊ शकते. म्हणूनच जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा अन्न ताजे असावे.
हंगामी फळांचं सेवन करा
महागड्या फळांऐवजी जर तुम्ही तुमच्या आहारात हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश केला तर तुमच्या यकृताला फायदा होईल. पावसाळ्यात जांभूळ, पपई, किवी यांसारख्या फळांचं सेवन करा. तसेच, हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात करा. सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. तुम्ही सफरचंदाचाही आहारात समावेश करू शकता.
मांस पदार्थांपासून दूर राहा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जे लोक प्राण्यांच्या उत्पादनांचा जास्त वापर करतात, त्यांचे यकृत इतर लोकांच्या तुलनेत खराब होण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ, लाल मांसाचे जास्त सेवन केल्याने तुमचे यकृत खराब होऊ शकते. याशिवाय जर तुम्ही चिकनसारख्या पदार्थांऐवजी डाळी, मसूर किंवा वाटाणे निवडले तर तुमच्या यकृताला प्रथिने देखील मिळतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील.
पदार्थांचा योग्य साठा करून ठेवा
तुमचं यकृत चांगलं ठेवण्यासाठी लाभ देणार्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही मोठ्या प्रमाणात साठा करू शकता. जसे की, तपकिरी तांदूळ, बीन्स, ओट्स आणि नट्स इ. पदार्थांचा साठा करून ठेवा. क्विनोआ यकृतासाठी निरोगी आहे, जर तुम्ही ते स्टॉकमध्ये घेतले तर तुम्ही रोजच्या आहारात त्याचा समावेश करून शरीराला अधिक फायबर देऊ शकता.
जर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करून घेतला तर तुमचे यकृत निरोगी राहील. तसेच, कोणताही आजार होण्यापासून भीती राहणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा