Calcium for bones : हाडे मजबूत करण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियमचा अभाव असेल तर हाडे ठिसूळ होतात. याचा मोठा परिणाम महिलांवर होतो. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हाडांच्या समस्या निर्माण होतात. हाडं ठिसूळ होण्याची समस्या पुरूषांच्या तुलनेत तिशीच्या पुढच्या महिलांमध्ये जास्त आढळून येते. तज्ञांच्या मते अनेक महिला वजन कमी करण्याच्या नादात खूप कमी आहार घेताता. परिणामी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. यामुळे महिलांनी पोषक आहार घेणे फार गरजेचे असते. रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा घ्या जाणून. 


पालेभाज्या खाणे ठरू शकते फायदेशीर 


डाॅ. रोहीणी पाटील (MBBS & Certified Nutritionist) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच यात लोह आणि व्हिटॅमिन ए यासारखे इतर पोषक घटकही असतात. शरीराला हवे असणारे कॅल्शियम मिळण्यासाठी तुम्ही पालकाची भाजी किंवा सॅलड खाऊ शकता. 


केळ


केळात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. सोबतच यात व्हिटॅमिन के, ए आणि सी असते. जेवण झाल्यावर तुम्ही साइड डिश म्हणून हे खाऊ शकता. तसेच केळाचे सूप किंवा स्मुदी बनवून तुम्ही हे पिऊ शकता. 


मस्टर्ड ग्रिन्स 


मस्टर्ड ग्रिन्स तुम्हाला हवे असणारे व्हिटामीन के, ए आणि सी देते. हे तुम्ही साइड डिश म्हणून हे खाऊ शकता किंवा याचे सूप बनवून पिऊ शकता. 


मेथीची भाजी


मेथ्यांच्या पानात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. याचा वापर तुम्ही भाज्यांमधून करू शकता. तसेच ही पाने तुम्ही नुसतेही खाऊ शकता. 


राजगिरा भाजी


राजगिराच्या पानात कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. ज्याचा शरीराला मोठा फायदा होतो. याचे सूप तसेच या पानांची भाजी तुम्ही बनवू शकता.


शक्ती देण्यासाठी शेंगा आणि कडधान्ये ठरतील फायदेशीर 


चणे


रोजच्या आहारात चण्यांचा समावेश केला तर कॅल्शियम , प्रथिने आणि फायबर मिळू शकते. याची उसळ ,सॅलेड बनवून तुम्ही खाऊ शकता.


मसूर


मसूरीच्या डाळीत कॅल्शियम , प्रथिने आणि लोह असते. याचा वापरही तुम्ही रोजच्या आहारात करू शकता. 


काळे वाटाणे 


काळ्या वटाण्यांमध्ये प्रथिने , लोह , कॅल्शियम असते. याची उसळ किंवा सॅलड बनवुन तुम्ही खाऊ शकता.


हिरवे हरभरे


हिरवे हरभरे यात कॅल्शियम, प्रथिने आणि कॅल्शियम , प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. याला उकडून किंवा सूप बनवून तुम्ही खाऊ शकता .


तसेच रोजच्या आहारात बदाम , चिया सिड्स , फ्लेक्ससीड आणि खसखस याचा समावेश करावा.यात शरीराला उपयुक्त असे कॅल्शियम, प्रथिने,  लोह, फायबर यांचा समावेश असतो. 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : रक्ताचा एक थेंब वाचवेल अनेक जीव, जाणून घ्या रक्तदानाविषयीचे समज आणि गैरसमज