Moong Dal For Health : स्वयंपाकघरातील डाळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत. जसे की, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चण्याची डाळ. यापैकी प्रत्येक डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही डाळी पचण्यास जड जातात, तर काही पचनास हलक्या असतात. प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारात एक वाटी कडधान्यांचा नक्की समावेश करावा. यापैकी मूग डाळ ही हलकी आणि पचण्याजोगी मानली जाते. मात्र, काही लोकांना मूग डाळ हानिकारक देखील ठरू शकते. जर तुम्ही मूग डाळ उकडून किंवा कच्ची खात असाल तर ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. तुम्हाला जर काही आजार असेल तर अशा लोकांनी मूगाच्या डाळीचे सेवन कसे करावे? हे जाणून घ्या.
'या' लोकांनी मूग डाळ खाऊ नये :
1. लो ब्लड प्रेशर : जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी मूग डाळ खाऊ नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा तुमचा ब्लड प्रेशर वाढू शकतो.
2. युरिक अॅसिड : जर तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास होत असेल तर, तुम्ही मूग डाळ मर्यादित प्रमाणात खावी. मूग डाळ खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.
3. पोट फुगण्याची समस्या : ज्या लोकांना पोट फुगण्याची समस्या आहे त्यांनी मूग डाळीचे सेवन करू नये. अशा लोकांना मूग डाळ पचण्यास त्रास होऊ शकतो.
4. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी : जर तुमची साखरेची पातळी कमी राहिली तर, तुम्ही मूग डाळ खाऊ नये. अशा लोकांना मूग डाळ खाल्ल्यानंतर चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.