World Osteoporosis Day 2023 : आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन. दरवर्षी 20 ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (World Osteoporosis Day 2023) साजरा केला जातो. वाढत्या वयामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढत जातो असे मानले जाते. पण सध्याच्या काळात बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना लहान वयातच ऑस्टिओपोरोसिसची समस्या भेडसावू लागली आहे. कमकुवत हाडांमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. या स्थितीत हाडांची घनता कमी होते. त्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. ऑस्टियोपोरोसिसच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा विशेष दिन साजरा केला जातो.
ऑस्टियोपोरोसिस हा शब्द ग्रीक आणि लॅटिन भाषेतील आहे. 'ऑस्टियो' म्हणजे हाडे आणि 'पोरोसिस' म्हणजे छिद्रांनी भरलेले. हा हाडांचा आजार आहे. यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. कालांतराने हाडे कमकुवत होणे किंवा ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळता येत नाही. परंतु त्याची प्रक्रिया नक्कीच कमी करु शकतो.
ऑस्टियोपोरोसिस टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करू शकता.
'या' गोष्टींचा जीवनशैलीत समावेश करा.
तुम्ही तुमच्या आहारात विशेषतः कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य घ्या आणि आवश्यक असल्यास पूरक आहार देखील घ्या. सकाळचा सूर्यप्रकाश आणि आहारातूनही ‘व्हिटॅमिन डी’ मिळू शकते.
व्यायाम करा
नियमितपणे व्यायाम करा. जसे की, चालणे, धावणे इ. हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस व्यायाम करा.
आरोग्यपूर्ण जीवनशैली
ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा. धूम्रपान करू नका आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. कारण या सवयींमुळे हाडे कमकुवत होतात.
शरीराचे वजन राखणे
वजन वाढल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो, त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रित ठेवता येते.
नियमित तपासणी करा
नियतकालिक हाडांची घनता स्कॅन ऑस्टिओपोरोसिस त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकता आणि वृद्धत्वानंतरही तुमची हाडे मजबूत राहतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :