World Heart Day 2023 : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आज जीवघेणा ठरत आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्ष वाढत चाचली आहे. कोरोनानंतर हृदयविकाराच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आजकाल तरूणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे. कार्डिओ मेटाबॉलिक इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, 2016 ते 2022 या काळात 20 ते 30 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढले आहे. जिममध्ये व्यायाम करतानाही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक घटनांमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे त्याचे कारण असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अशा परिस्थितीत, व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हृदयविकाराचा धोका कमी करू शकता. 
 
व्यायाम करताना हृदयविकाराचा धोका का असतो?


डॉक्टरांच्या मते, जिम किंवा डान्स करताना शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते. ज्याचा हृदयावर परिणाम होतो. हृदय वेगाने पंप करू लागते. नसांमध्ये रक्तपुरवठा वाढल्याने हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि हृदयाचा झटका येतो. 50 ते 70 टक्के ब्लॉकेज असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक वाढताना दिसते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढतं.
 
तुमच्या हृदयाची वेळीच तपासणी करा


हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, आजची जीवनशैली अशी झाली आहे की हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो. अशा परिस्थितीत याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. यासाठी वेळोवेळी हृदयाची तपासणी करणं गरजेचं आहे. एंन्जिओग्राफी आणि विविध चाचण्यांद्वारे हृदयातील ब्लॉकेजची माहिती आजकाल सहज उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत जर चाचणीमध्ये ब्लॉकेज आढळले तर व्यायाम करताना काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 
व्यायाम करताना 'अशी' काळजी घ्या



  • अचानक जड व्यायाम करणे टाळा.

  • नेहमी हलक्या व्यायामाने सुरुवात करा. 

  • व्यायामादरम्यान तुम्हाला अस्वस्थता जाणवत असल्यास, वर्कआउट ताबडतोब थांबवा.

  • स्टिरॉइड्स घेऊन जड व्यायाम करणे टाळा.

  • व्यायामा दरम्यान छातीत दुखल्यास हलक्यात घेऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा