Spices : सध्या देशातील अनेक राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) वाढला आहे. या थंडीच्या काळात गरम पदार्थांचं सेवन फायदेशीर ठरते. कारण थंडीचे आगमन होताच अनेकांना आजारांना सामोरे जावे लागते. सर्दी, खोकला यासारख्या समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या गरम मसाल्यांचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. 


थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचे सेवन करुन शरीर उबदार ठेवता येते. या सुगंधी गरम मसाल्यांमुळं भाजी चविष्ट तर होतेच पण या मसाल्यांचा आपल्या शरीरावर फायदेशीर परिणाम होतो. उष्णता निर्माण करण्यासाठी कार्य करते. चला जाणून घेऊया ते कोणते मसाले आहेत जे हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे.


लवंग


लवंगेत उष्णता असते. त्यामुळं हिवाळ्यात लवंगाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही चहा आणि भाज्यांमध्ये लवंग टाकून वापरू शकता. याचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते आणि लवंगातील सर्व पोषक तत्वांचा लाभही आपल्याला मिळतो.


तमालपत्र


तमालपत्र हा एक असा मसाला आहे, जो हिवाळ्यात खाल्ल्यास विशेष फायदे होतात. तमालपत्रात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक घटक हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. तमालपत्राची उष्ण प्रकृती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. खोकला, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर ठेवतात.याशिवाय हाडांसाठी आणि दातांसाठीही फायदेशीर आहे.


काळी मिरी


काळी मिरी एक तिखट आणि कडू चव आहे. हा एक असा मसाला आहे ज्याचा वापर हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


दालचिनी


दालचिनीचा उबदार प्रभाव शरीराला आतून उबदार ठेवतो, ज्यामुळे हिवाळ्याच्या थंडीपासून आराम मिळतो. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेच्या संसर्गासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.


हळद


हळद हा एक असा मसाला आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, विशेषतः हिवाळ्यात. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते जे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. याशिवाय घसा खवखवणे आणि सूज कमी होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Spices and Benefits : जेवणाच्या चवीबरोबरच 'हे' मसाले आरोग्याचा खजिना; वाचा त्यांचे उपयोग आणि फायदे