Coronavirus : जगभरात कोरोनाचा (Corona Virus) कहर खूपच भयानक होता. दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर विषाणूपासून काहीसा दिलासा मिळत होताच की, कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron) दार ठोठावले. लाखोंच्या संख्येने लसीकरण झाले असले तरी, यानंतरही लोकांमध्ये संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांचीही चिंता वाढली आहे.


काही तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे हे नवीन रूप फारसे चिंताजनक आणि प्रभावी नाही. मात्र, ओमायक्रॉनच्या धास्तीमुळे पुन्हा चाचणी घेण्याची सक्ती केली जात आहे. काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, काही काळानंतर हा विषाणू सामान्य आजारात बदलेल. असे म्हटले जात आहे की, ओमायक्रॉन अत्यंत संक्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे लसीकरण झालेल्या किंवा उच्च प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.


ओमायक्रॉन गंभीर नाही!


संशोधकाचा असा विश्वास आहे की, जरी ओमायक्रॉनची प्रकरणे पूर्वीपेक्षा वेगाने वाढत असली, तरी ती तितकी प्रभावी आणि गंभीर नाहीत. Omicronमुळे संक्रमित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. असा रुग्ण घरीच अलगी करणात राहून, औषध उपचार घेऊन बरा होत आहे. यावरून हे सिद्ध होते की, हा व्हेरियंट फारसा प्रभावी नाही.


कोरोना विषाणू सामान्य सर्दीसारखा होईल


फ्रेंच तज्ज्ञ अॅलेन फिशर यांचा असा विश्वास आहे की, ‘कदाचित आपण एक सामान्य व्हायरसकडे विकासाची सुरुवात म्हणून पाहत आहोत.’ क्लिनिकल व्हायरोलॉजिस्ट ज्युलियन टँग यांनी ओमायक्रॉनच्या गांभीर्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘मला अजूनही आशा आहे की, येत्या एक-दोन वर्षांत हा विषाणू इतर सामान्य सर्दी कोरोना व्हायरससारखा होईल.’


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha